pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

खोतकर यांनी केलेल्या मागण्या पूर्णत्वास नेण्याची जबाबदारी माझी-उदय सामंत

रिंग रोडमुळे एमआयडीसीत जाण्यास सुकर रस्ता-अर्जुन खोतकर

0 3 1 3 8 9
जालना/प्रतिनिधी, दि.15
रिंग रोडमुळे एमआयडीसीत जाण्यासाठी सुकर रस्ता तयार झाला असून यामुळे सोय झाली असली आम्हाला एमआयडीसीमध्ये अंतर्गत रस्ते हे सिमेंट हवे आहेत, या मागणी बरोबरच श्री. खोतकर यांनी यावेळी मंत्री महोदयांकडे अनेक समस्या मांडल्या. तर  श्री. अर्जुन खोतकर यांनी केलेल्या मागण्या पूर्णत्वास नेण्याची जबाबदारी माझी असल्याचे राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी यावेळी सांगितले.
यावेळी व्यासपीठावर सोनाली मुळे, अर्जुन गेही, सुरेश अग्रवाल, राजेंद्र भारुका, आदींची व्यासपीठावर उपस्थिती होती. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन श्री. भक्कड यांनी केले.
यावेळी बोलतांना शिवसेनेचे उपनेते तथा माजी मंत्री अर्जुनराव खोतकर म्हणाले की, जालना ही बियाणाची पंढरी असले तरी या ठिकाणाहून शासनाला बर्‍याच मोठ्या प्रमाणात महसूल जात आहे. मग तो कोणत्याही रुपात असो. मंत्री महोदयांकडे निर्देश करुन श्री. खोतकर म्हणाले की, याठिकाणी बसलेले  सामान्य वाटत असले तरी ते सामान्य नाहीत तर अगदी सर्वसामान्य आहेत, असे वाटत असले तरी प्रत्येक जण जवळपास पाच हजार लोकांना रोजगार उपलब्ध करुन देणारे आहेत. जालना ही बियाणांची पंढरी असली तरी या ठिकाणच्या व्यापार्‍यांनी अगदी मेहनतीने आप- आपले उद्योग उभारुन ते सांभाळले आहेत. राज्यात जालन्यातून विविध प्रकारचा कर भरणारे लोकं याठिकाणी आहेत. म्हणून त्यांच्या अडीअडचणी सोडण्यासाठी आपण निश्चितच प्रयत्न कराल, असे सांगून श्री. खोतकर म्हणाले की, एमआयडीसीला  रिंग रोड देण्याचा आपला प्रयत्न यशस्वी राहिला आहे. मग त्यासाठी आपल्याला अनेकवार दिल्ली आणि भोपाळला जावे लागले. या  वळण रस्त्यामुळे एमआयडीसीत कोणत्या जायचे असेल तर आपण जाऊ शकतो. परंतू आम्हाला या ठिकाणी डांबरी रस्ते नको तर सिमेंटचे रस्ते हवे आहेत. डांबरी रस्ते लवकर खराब होतात, असे सांगून श्री. खोतकर यांनी या ठिकाणी उद्योग भवन उभारण्याची मागणीही केली. त्यांचबरोबर  येथील उद्योजकांना सवलतीच्या दरात वीज उपलब्ध झाली पाहिजे. अशी त्यांची मागणी आहे. सोलारसाठी दोनशे- तीनशे एक्करचा परिसर देण्याची तयारी त्यांची आहे. परंतू ती वीज त्यांनाच मिळाली पाहिजे. त्यासाठी देखील आपण प्रयत्न करावा, अशी विनंतीही श्री खोतकर यांनी उद्योग मंत्र्यांकडे केली.  सुरेशभाऊंकडे दोन हजार रंगाच्या मिरच्या आहेत. त्यांनी कृषी प्रदर्शन भरवले तेव्हा मुख्यमंत्री म्हणाले होते, तुमच्याकडे एवढ्या प्रकारच्या मिरच्या आहेत, परंतू भगव्या रंगाची मिरची यात का नाही? त्यावेळी सुरेश भाऊ म्हणाले की, तुम्ही पुढच्या वर्षी या तुम्हाला भगव्या रंगाची मिरची सुध्दा दिसेल. आणि त्यांनी खरोखरच भगव्या रंगाची मिरची सुध्दा काढलीच, असे खोतकर म्हणताच सभागृहात एकच हशा पिकला.  त्यानंतर त्यांनी नांदेड समृध्दी महामार्गाचा उल्लेख केला. ते म्हणाले की, हा महामार्ग येथून जात आहेत. याचा अांनंद आहेच. परंतू शेतकर्‍यांचे काही प्रश्न आहेत. ते सोडवणेही गरजेचे आहे. त्यावेळी अधिकार्‍यांनी इन कॅमेरा चौकशी केली, पाहणी केली. त्यातील काही अधिकारी आता नाहीत परंतू इन कॅमेरा पाहणी करुनही शेतकर्‍यांचे प्रश्न सुटत नसतील तर त्याला म्हणार!
यावेळी बोलतांना उद्योग मंत्री उदय सामंत म्हणाले की, आचार संहिता ही आमच्यासाठी आहे, अधिकार्‍यांसाठी नाही, त्यामुळे येथील उद्योजकांचे कोणतेही काम अडणार नाही. आपण आत्ताच तशा सुूचना अधिकार्‍यांना दिल्या आहेत, असे सांगून श्री. सामंत म्हणाले की, श्री. अर्जुन खोतकर यांनी केलेल्या सर्व  मागण्या मार्गी लागल्या असे समजा! आपली प्रमुख मागणी ही विजेचे आहे! परंतू आम्ही आपल्याला पस्तीस टक्के सबसिडी देतो तेव्हाच ती विज तुम्हाला तीन रुपये या दराने मिळते, फक्त कागदावर दिसत नाही, एवढाच काय तो फरक आहे. वीजेचा प्रश्न अनेकांना गंभीर वाटत असला तरी तो इतका गंभीर आहे, असे मला तरी वाटत नाही, हे महायुतीचे सरकार म्हणजे उद्योजकांचे सरकार आहे, असे श्री. सामंत म्हणाले.
याप्रसंगी कालिका स्टीलचे गोपाल गोयल तसेच अभिमन्यू खोतकर, संजयभाऊ खोतकर, भाऊसाहेब घुगे आदींसह लघु उद्योग भारतीचे सभासद, स्टील असोसिएशनचे पदाधिकारी, मोंढ्यातील व्यापारी आणि शिवसेनेच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची मोठी उपस्थिती होती.
————————————————————
पुढचे उद्योग मंत्री तुम्हीच-खोतकर
तुमच्यासाठी आमच्या अनेक शुभेच्छा असून यापुढचे उद्योग मंत्री म्हणूनही तुम्हीच असणार! यात कुठलीही शंका नाही. तुमच्या साठी हात वर करण्याची तयारी आपली आहे.
=============================
कार्यक्रमाला उशिर झाला त्याचा राग तुम्ही भाऊंवर काढू नका, माझ्यावर काढा, आणि काही कारणांमुळे आपण ठरल्यावेळी येऊ शकलो नाहीत. त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो, असे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी सांगितले.
——————-
उद्योग मंत्र्यांनी उपस्थितीत व्यापार्‍यांच्या समस्या जाणून घेऊन त्या सोडण्याचा प्रामाणिक प्रयत्न करण्याचा शब्द यावेळी दिला. व्यापर्‍यांच्या अनेक संस्था, पदाधिकार्‍यांनी उद्योग मंत्री उदय सामंत आणि अर्जुन खोतकर यांचा शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार यावेळी केला.
———————————————————————-जालना येथील बंकट हॉलमध्ये  आयोजित व्यावसायिक आणि उद्योजक  यांच्या संवाद मेळाव्यात मार्गदर्शन करतांना उद्योग  मंत्री उदय सामंत! याप्रसंगी अर्जुन खोतकर व इतर व्यापारी वर्ग दिसत आहे
———————————————————————-
बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 3 1 3 8 9

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे