दूरदर्शनवर पीएमश्री जिल्हा परिषद राणी उंचेगाव शाळेची यशोगाथा

जितेंद्र गाडेकर/जालना,दि.14
शासनाच्या विविध योजना गाव पातळीवर कार्यान्वित आहेत. यातून राज्याचा विकास साधला जात आहे. राज्यात पीएमश्री योजना शाळेला मिळाल्यानंतर शाळेमध्ये झालेल्या भौतिक बदलामुळे शाळेचे वातावरण बदलत आहे. विद्यार्थी विकासात्मक कार्यक्रमातून गुणवत्ता सुधारत आहे. समग्र शिक्षा अभियान व पीएमश्री योजना या दोघांच्या समन्वयाने शाळा विकास शक्य होत आहे. डिजिटल लर्निंग, खेळ , कला , क्रीडा अंशकालीन निदर्शक नियुक्ती, विज्ञान उपक्रम , मासिक पाळी व्यवस्थापन , सॅनिटरी नॅपकिन वाटप, त्याचा वापर , इको क्लब, बालविवाह प्रतिबंध कार्यक्रम , वाहतूक भत्ता, मानव विकास अंतर्गत सायकल वाटप, वाचनालय , विद्यार्थी संरक्षणासाठी सीसीटीव्ही कॅमेरे बसविणे, शालेय पोषण आहार, स्वच्छतागृह, शुद्ध पिण्याचे पाणी व्यवस्था , परसबाग निर्मिती, मध्यान्ह भोजन योजना इत्यादी उपक्रम यशोगाथेमध्ये चित्रित केले आहेत. दूरदर्शन प्रतिनिधी जालना अनंत साळी यांनी ही यशोगाथा चित्रित करून तयार केली आहे. गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती घनसावंगी श्री रवी जोशी यांच्या मार्गदर्शनाने जिल्हा परिषद प्रशाला राणी उंचेगाव शाळेचा विकास होत आहे. यासाठी शाळेला सुविधा पुरविणारे सरपंच रत्नाताई बालासाहेब शिंदे , माजी सरपंच विठ्ठलजी खैरे , पत्रकार, सर्व राजकीय पक्षांचे पदाधिकारी , सर्व ग्रामपंचायत सदस्य , आरोग्य , महिला व बालकल्याण विकास विभागाचे अधिकारी , ग्रामसेवक, पोलीस पाटील , गावकरी , पालक , माता भगिनी यांनी शाळेचे मुख्याध्यापक , शिक्षक , शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष यांचे कौतुक केले आहे. यापुढे देखील राणी उंचेगाव येथील शाळा गुणवत्तेमध्ये विशेष नैपुण्य मिळवून राज्यभरात नावलौकिक करेल यासाठी अपेक्षा व्यक्त केली आहे.
पीएमश्री मध्ये निवड झालेल्या शाळांना निधी तसेच साहित्य सुविधा प्राप्त झाल्यामुळे अनेक सोयी उपलब्ध होत आहेत. यामुळे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होण्यासाठी मदत होत आहे. – रवी जोशी गटशिक्षणाधिकारी घनसावंगी
शाळा हा गावाचा आरसा आहे. जिल्हा प्रशाला राणी उंचेगाव शाळेची दूरदर्शन यशोगाथेसाठी निवड होणे ही संपूर्ण गावासाठी अभिमानास्पद गोष्ट आहे.तसेच गुणवत्ता पूर्ण शिक्षनासाठी लागणाऱ्या भोतिक तसेच शैक्षणिक सुविधा देण्यासाठी ग्रामपंचायत नेहमीच कटीबद्ध राहील
श्रीमती रत्नाताई बालासाहेब शिंदे सरपंच राणी उंचेगाव ता.घनसावंगी जिल्हा जालना