नरेंद्र माटोले ‘राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक गुरुगौरव शिक्षकरत्न’ पुरस्काराने सन्मानित!

जालना / प्रतिनिधी,दि.17
(दि.13) रोजी वनमाळी हॉल, तिसरा मजला, छबीलदास शाळेसमोर, आयडियल बुक डेपो शेजारी, दादर रेल्वे स्टेशन वेस्ट, मुंबई येथे पार पडलेल्या राज्यस्तरीय गुणिजन गौरव पुरस्कार वितरण सोहळयात जालना तालुक्यातील गोलापांगरी येथील कला शिक्षक नरेंद्र माटोले यांना ‘राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक गुरुगौरव शिक्षकरत्न’ पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. त्यांना हा पुरस्कार आदर्श कलाशिक्षक, समाजसेवक, गरजू विद्यार्थ्यांना मदत करण्यासाठी सदैव तत्पर यासाठी मिळाला आहे.
मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमी (रजि.
ट्रस्ट) यांच्या तर्फ दिला जाणाऱ्या गुणिजन गौरव पुरस्कार प्रदान समारंभ राज्यस्तरीय व राष्ट्रस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे व मार्गदर्शक वक्ते ह. भ. प. मा. श्री. श्यामसुंदर महाराज सोन्नर आळंदीकर हे होते सुप्रसिध्द विचारवंत संमेलन समारंभाचे अध्यक्ष मा. श्री. रमेश आव्हाड, सुप्रसिध्द साहित्यिक विशेष पाहुण्या मा. कु. रोशनी शिंदे, शिक्षणतज्ज्ञ महासंमेलन समन्वयक मा. श्री. प्रकाश सावंत संयोजक पुरस्कार मानकरी महामंच समारंभ मार्गदर्शक मा. श्री. जनार्दन कोंडविलकर समाजसेविक व कामगार नेते हे होते या मान्यवरांच्या प्रमुख उपस्थिती त वरील कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
पुरस्कार मिळाल्याबद्दल यांचे सर्व स्थरातून कौतुक होत आहे.