मे. ॲाल कारगो टर्मिनल प्रा. ली. (ट्रान्सइंडीया) कंपनी खोपटे, उरण या कंपनीमध्ये राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघ (RMBKS) युनियन स्थापन.

उरण/विठ्ठल ममताबादे,दि.25
मे. ॲाल कारगो टर्मिनल प्रा. ली. खोपटे, ता. उरण, जि. रायगड या कंपनीमध्ये सुपरवायझर कामगारांसाठी राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघ (RMBKS) युनियनची स्थापना करण्यात आली.
सदर युनियनच्या नामफलकाचे उद्घाटन कामगार नेते संतोषभाई घरत (राष्ट्रीय उपाध्यक्ष) व गणेश यशवंत पाटील (रायगड जिल्हा अध्यक्ष) यांनी केले. याच कंपनीमध्ये आपली लेबर कामगारांची युनियन कार्यरत असून सुपरवायझर कामगारांनी आनखी एक युनिट स्थापन करून संघटनेवर जो विश्वास दाखविला आहे तो तुटून देणार नाही व सुपरवायझर कामगारांनी संघटनेची ताकद वाढवली आहे. लेबर कामगारांप्रमाणे सुपरवायझर कामगारांचे जे काही प्रश्न असतील ते कंपनी व्यवस्थापना सोबत बसून निश्चीतपणे समोपचाराने सोडविले जातील असे आश्वासन कामागार नेते संतोषभाई घरत यांनी दिले. तसेच मालक आणि कामगार हे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत, त्यामुळे दोघांनीही एकमेकाला समजून घेणे गरजेचे असते. आपल्याला कोणतिही अडचन आली तर युनियन आपल्या पाठीशी खंबिरपणे उभी राहील. असे विचार गणेश यशवंत पाटील त्यांनी व्यक्त केले. संघटनेच्या कार्याबद्दल कॅान्टीनेंटल कंपनीचे माजी युनिट अध्यक्ष अच्युत ठाकूर यांनी मार्गदर्शन करून कामगारांचा विश्वास वाढविला. सदर उद्धाटन कार्यक्रम एकदम उत्साहात साजरा करण्यात आला असून सदर कार्यक्रमात सर्व सुपरवायझर कामगार तसेच कॅान्टीनेंटल कंपनीचे युनिट अध्यक्ष परेश ठाकूर, ट्रान्सइंडीया कंपनीचे युनिट अध्यक्ष रामेश्वर पाटील व विशाल पाटील तसेच इतर कंपन्यांचे कामगार उपस्थित होते.