राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने उरण मध्ये आदिती महोत्सव
आदिती महोत्सवच्या माध्यमातून महिला सशक्तिकरण

उरण/विठ्ठल ममताबादे,दि.10
स्त्री ही आदिशक्तीचे रुप आहे. आदिमायेची स्वरूप आहे. एक स्त्री सर्वच भूमिका निभावत असते. आई, काकी, मावशी, बहीण, बायको, वहिनी, मैत्रीण आदी विविध भूमिका एकच स्त्री उत्तमपणे निभावत असते. त्यामुळे आदर्श स्त्री ही देवता स्वरूप मानली जाते. या स्त्रीयत्वाचा मान सन्मान करण्याच्या दृष्टीकोणातून तसेच स्त्रियांना एकत्र करून त्यांना आत्मनिर्भर, सशक्त बनविण्याच्या दृष्टीकोणातून रायगड जिल्ह्यात अनेक ठिकाणी आदिती महोत्सवाचे आयोजन करण्यात येत आहे. अशाच प्रकारचे आदिती महोत्सव उरण तालुक्यातही मोठया उत्साहात पहिल्यांदाच साजरे करण्यात आले.राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजितदादा गट )च्या वतीने खासदार सुनिल तटकरे यांच्या संकल्पनेतून मा. ना. कॅबिनेट मंत्री आदितीताई तटकरे, आमदार अनिकेत तटकरे यांच्या मार्गदर्शनानुसार उरण तालुक्यात एमजी वेअर हाऊस धुतुम येथे भव्य दिव्य स्वरूपात हळदी कुंकू कार्यक्रम घेण्यात आला. सौभाग्याचे वाण या कार्यक्रमात एकमेकांना वाटण्यात आले.अंत्यत उत्साहात हा कार्यक्रम संपन्न झाला. या प्रसंगी महिलांसाठी लोकगीताचा ऑर्केस्ट्रा, नृत्यअविष्कार, लकी ड्रॉ, पैठणी बक्षिसे, महिलांसाठी भेट वस्तू असे अनेक विविध कार्यक्रम या महोत्सव मध्ये राबविण्यात आले . या सर्व कार्यक्रमांना महिलांनी मोठया प्रमाणात हजेरी लावली होती.हजारो महिलांनी उपस्थित राहून या सर्व कार्यक्रमाचा मनसोक्त आनंद लुटला.विश्रांती ताई घरत व चिर्ले सायकल लाभार्थी तर्फे उमाताई मुंढे यांना छोटीसी भेट वस्तु देण्यात आली.
प्रसिद्ध मराठी अभिनेत्री रसिका वेंगुर्लेकर,उमाताई मुंढे ( राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जिल्हा अध्यक्षा तथा विद्यमान सरपंच वासांबे ग्रामपंचायत ),कुंदा वैजनाथ ठाकुर- उरण तालुका महिला अध्यक्षा, वैशालीताई सामंत,रेश्मा रंधिर ठाकुर, रंजना मेघनाथ ठाकुर , उज्ज्वला सुनिल ठाकुर, शमिता दत्ता ठाकुर, मुक्ता लिलाधर घरत, वंदना मनोहर ठाकुर,भारती समाधान कटेकर,प्रणाली प्रविण घरत, प्रतिज्ञा सागर ठाकूर, वैशाली अरुण ठाकुर,संध्या विक्रम ठाकुर,माजी उपसरपंच धुतुम- वैशाली पाटील ,सुलोचना पाटील, पिंक्की हेमंत घरत, डॉ. रंजना म्हात्रे, उज्वला दीदी, पूजा विशाल पाटील आदी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महिला पदाधिकारी कार्यकर्ते, सामाजिक महिला कार्यकर्त्या,मान्यवर यावेळी उपस्थित होत्या.सदर आदिती महोत्सव यशस्वी करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजितदादा गट )चे सर्वच पदाधिकारी कार्यकर्त्यांनी विशेष मेहनत घेतली.प्रसिद्ध निवेदक नितेश पंडित सर , श्याम ठाकुर, आकाश घरत ( फोटो ग्राफर ) , तसेच द्रोणागिरी साऊंड सर्विस धुतुम यांचेही मोलाचे सहकार्य या महोत्सवाला लाभले आहे.या महोत्सवाला महिलांचा मोठया प्रमाणात उत्तम प्रतिसाद लाभला आहे.