pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

फेस्टीव्हलचं कौतूक करावं तेवढचं कमी-हभप पुरुषोत्तम महाराज पाटील

0 3 1 3 8 0
जालना/प्रतिनिधी, दि.10
जालना : जालना गणेश फेस्टीव्हलचं कौतूक करावं तेवढचं कमी आहे, ते यासाठी की, एवढ्या मोठ्या आयोजनात किर्तनाचा कार्यक्रम ठेवला. किर्तनाचाच कार्यक्रम ठेवावा, या मताचा मी मुळीच नाही, असे निरुपन हपभ पुरुषोत्तम महाराज पाटील यांनी येथे बोलतांना केले.
यावेळी फेस्टीव्हलचे अध्यक्ष राजेंद्र गोरे, संस्थापक अध्यक्ष डॉ.संजय लाखे पाटील, दिनेश फलके, राजेंद्र राख, सुभाष कोळकर, किरण गरड, अंकुशराव राऊत, माजी राज्यमंत्री अर्जुनराव खोतकर, पंडीतराव भुतेकर, प्रा. राजेंद्र भोसले, विष्णू पाचफुले, भास्करराव दानवे, बाला परदेशी, जगत घुगे, अ‍ॅड. वाल्मिक घुगे, प्रकाश जायभाये, अजिंक्य घोगरे, संयोजन समितीतील पदाधिकार्‍यांची उपस्थिती होती.
प्रारंभी डॉ. संजय लाखे पाटील, अंकुशराव राऊत, राजेंद्र गोरे आदींनी पुरुषोत्तम पाटील महाराज यांचा सत्कार केला.
धर्माचे पालन करणे पाखंड खंड करणे, बीज वाढवावे नाम। तिक्ष्ण उत्तरे हाती घेऊनी बाण । ते वेद आठवावे नाम, हेचि आम्हा करणे काम। या संत तुकाराम महाराजांच्या अभंगावर निरुपन करतांना श्री. पाटील महाराज म्हणाले की, गणपती पुढे हिंदी गाणे लावण्याचा अधिकार आपल्याला कुणी दिला? नको ते गाणे लावण्याचा अधिकार कुणी दिला? असा प्रश्न करुन ते म्हणाले की, मजिदीवर कधी हिंदी गाणे लागले का? जैन, ख्रिश्चन, बौध्द आदींनी त्यांच्या मंदिरावर, बौध्द विहारावर कधी तरी हिंदी गाणे लावले का? मग आपणही याचा विचार करायला पाहिजे, असे सांगून श्री. पाटील महाराज म्हणाले की, मी किर्तनचं ठेवा, असा अट्टास ठेवणार नाही. एवढा मोठा खर्च आणि धांगडधिंगा करण्याचा पेक्षा असे काही कार्यक्रम ठेवा की, ज्यामुळं समाजाचं प्रबोधन होईल. तुमच्या परिसर स्वच्छ करा, असे सांगून ते म्हणाले की, एकदम ढ पोरागा नोकरीला तर तो काय म्हणतो की, माझी काही तरी पुण्याई असेल म्हणूनच मी नोकरीला लागलो आहे. एखादा मोटारसायकलवर चालला आणि त्याला ट्रकने धडक दिली, त्याला जेव्हा गावकरी भेटायला जातात, तेंव्हा तोही म्हणतो की, माझी काही तरी पुण्याई असेल म्हणून मी वाचलो. नाही तर एवढा मोठा ऊसाचा ट्रक अंगावर आल्यावर कोणी वाचेल का? आपण सर्व जण आज ही पुण्याई विसरत चाललो आहोत. परंतू मायबाप हो एक सांगू का कधीच असे वागू नका की, ज्यामुळं आपली मान खाली जाईल, जगायचे असेल तर पुण्याईने जगा! वारीत दहा लाख भाविक असतात, पण त्या ठिकाणी पोलीस तुम्हाला क्वचितच दिसेल, आज काही खुर्च्या रिकाम्या दिसत असल्या तरी उद्या- परवा मात्र येथे बसायलाही जागा पुरणार नाही, म्हणून तुम्हाला धन्यवाद की, तुम्ही किर्तनाचा कार्यक्रम ठेवला. सपने तो हर कोई सजता है, मगर यहॉ पर वही आता है जिसको मेरा परत्मा बुलाता है! आपल्या जीवनात चांगली बायको मिळावी म्हणूनही पुण्यचं लागतं. आज पाखंडी लोकांचा भरणा झाला आहे. नको ते दाखणे म्हणजेच पाखंडी! धर्माला दुसर्‍या पासून दु:ख नाही पण ज्यांनी धर्माचं पांघरुण घेतलं आहे, त्यांच्यापासून धोका आहे. तुम्हाला जसं पटतं असं वागू नका. बायको जर नवर्‍याला आवडनारी भाजी केलं तर तिला जी भाजी आवडते ती केली तर… म्हणून परमार्थ करतांनाही आपल्याला पटतो तसा नको तर तो देवाला पटला पाहिजे. आज गरीब कोणी नाही, पैसा आहे, फोर व्हीलर आहे, राहायला बंगला आहे, परंतू लोकं विचाराने भिकारी झालेत, याचं दु:ख आहे. प्रेमाने जगायला शिका. अखेर धर्म आहे तरी काय? जो माणूस माणसाशी प्रेमाने वागतो तोच खरा धर्म! आज माणूस दुसर्‍याचं सुख पाहून दु:खी आहे. भारत माता असं म्हटलं आहे. मी अनेक ठिकाणी फिरतो, विदेशातही जाऊन आलो परंतू भारतासारखा दुसरा देश नाही. नुकताच बांगलादेशाच्या पंतप्रधान भारतात आल्या. खरे तर जगात 56 देश मुस्लीम आहेत. पण त्यांना तेथे सुरक्षीत वाटले नाही, असे सांगून ते म्हणाले की, नाही ते दाखवू नका.यावेळी महाराजांनी एक उदाहरणही देऊन पटवून देण्याचा प्रयत्न केला. ते म्हणाले की, हे जग जरी पाखंडी असले तरी आपण त्यात गुरफटून जाऊ नका. संतांनी सांगून ठेवले की, व्देष, मत्सर आणि लोभ याचा त्याग करा आणि भगवंतांसाठी वेळ द्या. त्यासाठी वेळ द्या, तुम्ही दोन तास दिले तर तो तुमच्यासाठी दहा तास देईल, परंतू तुम्ही वेळच देणार नाहीत तर तो तरी कसा देईल. नाम घेता वाया गेला, असा माणूसच नाही. म्हणूनच देवाचं नाम घ्या! सूर्य, पाऊस कधी बील पाठवतात का? असे सांगून ते म्हणाले की, भगवंतांला वेळ द्या, असेही हभप पुरुषोत्तम पाटील महाराज यांनी शेवटी सांगितले.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन हरिहर शिंदे यांनी केले. यावेळी अवनिश गरड, बबनराव गाडेकर, सतिष देशमुख, प्रा. राजेंद्र भोसले, प्रसाद वाढेकर, संदीप गायकवाड, शुभम् टेकाळे, रोहीत देशमुख, अनिल व्यवहारे, गौतम वाघमारे, श्री. जिगे, मधुकर मुळे आदींची उपस्थिती होती.
…. तर सीसीव्हीची गरज नाही!
रामगिरी महाराजांचा विषय निघाला तेव्हा पुरुषोत्तम महाराज म्हणाले, मी सलाम करतो त्या मुख्यमंत्र्यांना ज्यांनी माईक हातात घेऊन सांगितले की, त्यांना अटक होणार नाही. एकनाथ शिंदे जागी दुसरा कोणीही मुख्यमंत्री असू द्यात नक्कीच रामगिरी महाराजांना अटक झाली परंतू वारकर्‍यांच्या केसालाही धक्का लागणार नाही, असे त्यांनी निक्षून सांगितले. मुलीच्या सुरक्षेबाबत त्यांनी भाष्य केलं. ते म्हणाले की, 1947 साली भारत मुक्त झाला. परंतू मी असे समजत नाही. त्याचे कारण आपण खरोखरच सुरक्षीत आहोत? बदलापूरची घटना घडली, ती सर्वांना ज्ञात आहे. रावणाला दहा तोंडे होती. म्हणजेच तो   वीस डोळ्यांचा होता. पण त्याची नजर कोणाही पर स्त्रीवर गेली नाही. फक्त सीतेमुळे इतका बदनाम झाला की, पाहयची सोय नाही. मुलगी शाळेत जर गेली तर घरी येईल का नाही, याची खात्री नाही. शाळेत सीसीटीव्ही बसवून हा प्रश्न सुटणार नाही तर जोपर्यंत ही राक्षसी प्रवृत्ती आपल्या मनातून जात नाही, तोपर्यंत तरी बलात्कार थांबेल, असे वाटत नाही. म्हणून ही प्रवृत्ती गेली पाहिजे.
—————————————————————
आज लावण्यांचा कार्यक्रम
उद्या 11 सप्टेंबर रोजी सायंकाळी 6 वाजता ड्रीम गर्ल प्रिया पाटील व धिंगाणा क्वीन स्वाती मुंबईकर यांचा बहारदार लावण्यांचा कार्यक्रम होणार आहे या कार्यक्रमाचा जालनेकरांनी आस्वाद घ्यावा, असे आवाहन फेस्टीव्हलचे अध्यक्ष राजेंद्र गोरे आणि संयोजन समितीने केले आहे.
बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 3 1 3 8 0

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे