उल्लेखनीय काम करणारे पोलीस अधिकारी, अंमलदार यांचा यांचा मा. विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. ज्ञानेश्वर चव्हाण यांचे हस्ते सन्मान…

कन्नड/ कृष्णा घोडके,दि.15
औरंगाबाद ग्रामीण जिल्हया मध्ये मागील ५ वर्षा मध्ये कोशल्य पूर्ण तपास करून आरोपीतांना शिक्षा शाबीत करून उल्लेखनीय काम करणारे पोलीस अधिकारी, अंमलदार यांचा व शासकीय अभियोक्ता यांचा मा. विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. ज्ञानेश्वर चव्हाण यांचे हस्ते सन्मान…
मा. विशेष पोलीस महानिरीक्षक औरंगाबाद परिक्षेत्र, औरंगाबाद यांचे अभिनव संकल्पनेतून औरंगाबाद ग्रामीण जिल्हया मध्ये मागील ५ वर्षाचे कालावधी मध्ये केलेल्या कौशल्यपूर्ण तपासा करून दोषसिध्दी मिळवीणारे तपास अधिकारी व अंमलदार तसेच शासकीय अभियोक्ता यांचा सन्मान करणे बाबत सूचित केले होते. यापूर्वी दोषसिध्दी मिळवीणारे पोलीस अधिकारी, अंमलदार व शासकीय अभियोक्ता यांचा प्रत्येक महिन्याचे गुन्हे परिषदे मध्ये सर्वात जास्त दोषसिध्दी मिळवणा-यांचाच सन्मान करण्यात येत होता. परंतु सर्वच पोलीस अधिकारी, अंमलदार व शासकीय अभियोक्ता यांना प्रशंसापत्र प्राप्त होत नव्हते. ज्या ज्या पोलीस अधिकारी, अंमलदार यांनी दोषसिध्दी घेतलेली आहे अशा सर्व पोलीस अधिकारी, अंमलदार यांचा गौरवोद्गार होणे गरजेचे आहे. या अभिनव संकल्पनेतून औरंगाबाद ग्रामीण जिल्हया मध्ये मा. पोलीस अधीक्षक श्री. मनीष कलवानिया यांच्या मार्गदर्शना मध्ये आज दिनांक १४/०६/ २०२३ रोजी आचार्य विनोबा भावे हॉल जवाहरलाल नेहरू अभियांत्रीकी महाविद्यालय परिसर एम.जी.एम औरंगाबाद येथे १७.०० वाजता मागील ५ वर्षाच कालावधी मध्ये केलेल्या कौशल्यपूर्ण तपासा करून दोषसिध्दी मिळवीणारे तपास अधिकारी व अमलदार तसेच शासकीय अभियोक्ता यांचा सन्मान व प्रशंसापत्र बितरण कार्यक्रम आयोजीत करण्यात आला होता. सदर कार्यक्रमास मुंबई, नांदेड, परभणी, बुलढाणा, नाशिक, नंदुरबार, पुणे, हिंगोली, जालना, बीड, उस्मानाबाद, नागपूर घटकातील पोलीस अधिकारी व अंमलदार आणि सेवानिवृत्त झालेले पोलीस अधिकारी व अंमलदार, औरंगाबाद ग्रामीण जिल्हयात सत्र न्यायालयातील शासकीय अभियोक्ता व पैरवी पोलीस अधिकारी व अंमलदार यांना आमंत्रीत करण्यात आले होते.
त्या अनुषंगाने औरंगाबाद ग्रामीण जिल्ह्यातील सर्व पोलीस स्टेशन मधील ज्या ज्या पोलीस अधिकारी, अंमलदार व शासकीय अभियोक्ता यांनी मागील ५ वर्षाचे कालावधीत उत्कृष्ट तपास करून दोषसिध्दी प्राप्त करण्यात आली होती… अशा एकूण १७७ खटल्यांमध्ये कौशल्यपूर्ण तपास करणारे पोलीस अधिकारी, अंमलदार व शासकीय अभियोक्ता यांना मा. विशेष पोलीस महानिरीक्षक यांचे हस्ते प्रमाणपत्र देऊन सन्मानीत करण्यात आले. मागील ५ वर्षांचे कालावधीत गंभीर स्वरूपाच्या गुन्हयांमधील एकूण १७७ खटल्यांमध्ये ३१ खटल्यांमध्ये जन्मठेपेची शिक्षा, १४ खटल्यांमध्ये १० वर्षा पेक्षा जास्त शिक्षा, २९ खटल्यांमध्ये ५ ते १० वर्षाची शिक्षा, १०३ खटल्यांमध्ये १ ते ५ वर्षाची शिक्षा सुनावण्यात आलेली आहे. कलम निहाय सदर खटल्यांचे अवलोकन करता ३३ खटल्यात कलम ३०२ भा.दं.वि., २२ खटल्यात कलम ३०७ भा.दं.वि., ७ खटल्यात दरोडा व जबरी चोरी, ८ खटल्यात बाल लैंगीक अत्याचार प्रतिबंधक अधिनियम ३६ खटल्यात कलम ३७६ भा.दं.वि. २६ खटल्यात कलम ३५४ भा. दं. वि. ११ खटल्यात कलम ३५३ भा.दं.वि. ६ खटल्यात हुंडाबळी व १० खटल्यात इतर भा. दं. वि. व १८ + खटल्यात अ.जा.ज.अ.प्र.का. प्रमाणे कौशल्यपूर्ण तपास करून नमुद खटल्यात दोषसिध्दी झालेली आहे. दोषसिध्दी झालेल्या खटल्यांमधील कौशल्यपूर्ण तपास करणारे ६६ तपास पोलीस अधिकारी यांचा प्रशंसापत्र देऊन सन्मान करण्यात आला. तसेच सदर खटल्याचे सुनावणी पुर्वी कामकाज करणारे पेरवी ५२ पोलीस अधिकारी व अंमलदार यांचा प्रशंसापत्र देऊन सन्मान करण्यात आला. तसेच सदर खटले मा. न्यायालया समोर योग्यरीत्या मांडून पुराव्या शाबीती मध्ये महत्त्वाची भुमीका निभावणारे शासकीय अभियोक्ता यांचा सुध्दा प्रशंसापत्र देऊन सन्मान करण्यात आला आहे.
मागील ५ वर्षाचे कालावधी मध्ये केलेल्या कौशल्यपूर्ण तपासा करून दोषसिध्दी मिळवीणारे तपास
अधिकारी व अंमलदार तसेच शासकीय अभियोक्ता यांचा सन्मान समारंभ प्रसंगी बोलतांना मा. विशेष पोलीस
महानिरीक्षक . डॉ. ज्ञानेश्वर चव्हाण यांनी उपस्थित शासकीय अभियोक्ता, पोलीस अधिकारी व अंमलदार
यांच्याशी संवाद साधून तपास अधिकारी, अंमलदार व शासकीय अभियोक्ता यांचे बद्दल गौरवोद्गार व्यक्त करून
प्रशंसा केली. जास्तीत जास्त खटल्यांमध्ये दोषसिध्दी व्हावी यादृष्टीने आणखी प्रयत्न करून सामान्य जनतेचा कायद्यावरील विश्वास आणखी दृढ करण्या करीता जास्तीत जास्त दोषसिद्धी कशी होईल या दृष्टीने कौशल्यपूर्ण तपास करून जास्तीत जास्त गुन्हयात दोषसिध्दी कशी होईल या विषयी मार्गदर्शन करून आगामी काळात गुन्हे दोषसिध्दीचे प्रमाण वाढवून सामान्य जनतेचा कायद्या विषयी विश्वास वाढेल, आरोपीतांवर कायद्या विषयी भिती निर्माण होईल कोणीही गुन्हे करण्यास धजावणार नाही कायद्याचे कोणीही उल्लंघन करणार नाही कायदा व सुव्यवस्था अबाधीत राहील असा विश्वास व्यक्त करून याबाबत मार्गदर्शन केले व औरंगाबाद परिक्षेत्रा मधील सर्व जिल्हयांमध्ये असाच कार्यक्रम यापुढे राबविण्यात येईल असे सांगितले. औरंगाबाद ग्रामीण जिल्हयामध्ये प्रथमतःच मा. विशेष पोलीस महानिरीक्षक यांच्या अभिनव संकल्पनेतून मा. पोलीस अधीक्षक मनीष कलवानिया व अपर पोलीस अधीक्षक सुनिल कृष्णा लांजेवार यांचे मार्गदर्शना मध्ये सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. प्रशंसापत्र प्राप्त करणारे पोलीस अधिकारी, अंमलदार व शासकीय अभियाचा उत्साह द्विगुणीत झाला असून यापूढेही असेच कौशल्यपूर्ण साम करून अधिकाधिक न्हामध्ये दोष करीता आणी विशेष जास्तीत जास्त होईल या करता येणा-या उपाय योजनाया माहिती देऊन जास्तीत जास्त दासी प्राप्त केली जाईल विश्वास पोलीस अधीक्षक मनीष कलवानिया यांनी व्यक्त केला.