pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

छत्रपती संभाजीनगरमध्ये 26 व 27 रोजी मूल्यसंस्कार मेळावा आणि मातृ-पितृ पाद्यपूजन सोहळा

विविध विषयांवरील उभारलेली ज्ञानदालने ठरणार प्रमुख आकर्षण

0 1 7 7 7 3

छ.संभाजीनगर/आनिल वाढोणकर,दि.23

अखिल भारतीय श्री स्वामी सेवा मार्गाच्या बाल संस्कार व युवा प्रबोधन विभागातर्फे छत्रपती संभाजीनगर मध्ये दिनांक 26 व 27 नोव्हेंबर 2023 रोजी परमपूज्य गुरुमाऊली श्री. अण्णासाहेब मोरे यांच्या पावन सानिध्यात भव्य “मूल्यसंस्कार मेळावा आणि मातृ-पितृ पाद्यपूजन सोहळा” आयोजित करण्यात आला आहे. भावी सुसंस्कारीत, निर्व्यसनी, सदाचारी आणि कर्तुत्वान अशी पिढी निर्माण व्हावी या उद्देशाने श्री स्वामी सेवा मार्गाच्या बालसंस्कार व युवा प्रबोधन विभागातर्फे सातत्यपूर्ण विविध उपक्रम राबविले जातात. याच उपक्रमाचा एक भाग म्हणून “मूल्य संस्कार मेळावा आणि मातृ पितृ पाद्यपूजन सोहळा” होणार आहे. आई वडील हे आपले प्रथम गुरु आहेत ही भारतीय संस्कृतीची शिकवण आहे. आपली भारतीय संस्कृती आणि शिकवण अधिक बळकट होण्यासाठी तसेच “वृद्धाश्रममुक्त भारत” ही संकल्पना समाजापर्यंत प्रसारित करण्याचा उद्देश या उपक्रमातून ठेवण्यात आला आहे. दोन दिवसीय असलेल्या या कार्यक्रमाची सुरवात दि. २६ नोव्हेंबर रोजी सकाळी ८:३० वाजता सामाजिक संदेश देणाऱ्या भव्यदिव्य संदेश यात्रेने होईल. त्यानंतर गुरुपुत्र श्री. चंद्रकांत दादा मोरे व श्री. नितीन भाऊ मोरे यांच्या शुभ हस्ते “मूल्यसंस्कार ज्ञानदालन प्रदर्शनाचे” उदघाटन होईल. दुपारी ठीक १२ वाजता पालक वर्गासाठी विशेष उपयुक्त असलेल्या “मूल्यसंस्कारातून पालक व पाल्य सुसंवादाकडे” या विषयावर आणि दुपारी ठीक २ वाजता “वंध्यत्वातून मातृत्वाकडे” या विषयावर महत्वपूर्ण असे चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे तसेच सायंकाळी ठीक ४ वाजता मनोरंजनातून सामाजिक प्रबोधन करणाऱ्या सांस्कृतिक कार्यक्रमाचे सादर केले जाणार आहेत. सायंकाळी ६ वाजता गुरुपुत्र श्री आबासाहेब मोरे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये तुलसी विवाहाचे आयोजन करण्यात आले असून उपस्थित्तींना मार्गदर्शन करण्यात येणार आहे. दिनांक २६ नोव्हेंबर रोजी सकाळी ठीक १० वाजता “स्पर्धा परीक्षा व करियर संधी” या विषयावर तज्ज्ञांचे मार्गदर्शन युवा वर्गास लाभणार असून दुपारी १२ वाजता “आदर्श युवा- समर्थ भारत” या महत्वपूर्ण विषयावर चर्चासत्र घेण्यात घेण्यात येणार आहेत. युवा वर्गास रोजगार उपलब्ध होण्यासाठी १०० पेक्षा जास्त संस्था/कंपन्यांचा या उपक्रमातून सहभाग असून या द्वारे युवा वर्गास नोकरीच्या संधी उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.दिनांक २७. ११. २०२३ सायंकाळी ठीक ४ वाजता परमपूज्य गुरुमाऊली श्री.अण्णासाहेब मोरे यांच्या पावन सानिध्यात मातृपितृ पाद्यपूजन सोहळ्याचे आयोजन करण्यात आलेले आहे. हा मातृ-पितृ पाद्यपूजन सोहळा संपन्न झाल्यानंतर परमपूज्य गुरुमाऊलींचे प्रबोधनपर हितगुज संपन्न होईल या उपक्रमाचे प्रमुख आकर्षण म्हणजे या विभागाच्या वतीने उभारली जाणारी ज्ञानदालने होय. त्यामध्ये ऋषी-मुनींचे वेद- विज्ञान संशोधनाचे सादरीकरण, सात्विक आहार, निरोगी आरोग्यासाठी मार्गदर्शन, युवकांच्या व्यक्तिमत्व विकासावर मार्गदर्शन, स्पर्धा परीक्षा, करियर ,नोकरी बाबत अचूक मार्गदर्शन, सण-वार- व्रत-वैकल्यांबाबत भारतीय आणि वैज्ञानिक सादरीकरण दुर्गसंवर्धन कार्य आणि इतिहासामधील शस्त्रांचे प्रदर्शन, पारंपरिक खेळांचे महत्त्व आणि सादरीकरण, मुलांचा सर्वांगीण आणि पंचेंद्रिय विकासावर मार्गदर्शन, आजीबाईच्या बटव्याचे महत्त्व भारतीय कायद्यांची माहिती, सेवा मार्गातील सामाजिक उपक्रमांचे सादरीकरण व मांडणी तसेच दहावी, बारावी आणि पदवीनंतर करिअरच्या संधी या विषयावर मार्गदर्शन होणार आहे. तरी या दोन दिवसीय मूल्य संस्कार मेळाव्याचा सर्वांनी लाभ घ्यावा असे आवाहन मूल्यसंस्कार मेळावा आयोजन समिती यांच्या वतीने करण्यात आले आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 7 7 7 3

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे