शुक्रवारी जालना शहरातील वाहतुकीच्या मार्गात बदल

जालना/प्रतिनिधी,दि.1
श्री गजानन महाराज संस्थान शेगाव या न्यासाची श्री ची पालखी पायदळवारी पालखी पंरपरेनुसार पंढरपुर येथुन परतीच्या मार्गावर आहे. या दिंडीमध्ये 700-800 वारकरी सहभागी आहेत. शुक्रवार दि.2 ऑगस्ट रोजी जालना शहरात पारंपारिक मार्गाने श्रीची मिरवणूक काढण्यात येणार आहे. त्यामुळे 2 ऑगस्ट रोजी जालना शहरातील वाहतुकीच्या मार्गात बदल करण्यात आला आहे, असे आदेश पोलिस अधिक्षक अजयकुमार बन्सल यांनी जारी केले आहे.
मोतीबाग चौकाकडुन येणारी व शनिमंदीर चौक मार्गे नवीन जालनाकडे जाणारी वाहतुक ही मोतीबाग जवळुन अंबड चौफुली मार्गे मंठा चौफुली जाईल व येईल. नुतन वसाहत परिसराकडुन उड्डानपुल मार्गे येणारी व शनिमंदीर चौक मार्गे नवीन जालनाकडे जाणारी वाहतुक ही नुतन वसाहत ते अंबड चौफुली मार्गे मंठा चौफुली मार्गे जाईल व येईल. रेल्वे स्थानकाकडून येणारी व गांधी चमन मंमादेवी चौक मार्गे नवीन जालन्याकडे जाणारी वाहतूक रेल्वे स्टेशन ते मंमादेवी चौकातून एमएसईबी कार्यालय येथून राजमहल टॉकीज पूल मार्गे चामडा बाजार या मार्गाने जाईल. गणपती गल्ली ते बाजार चौकीपासून माळीपुरा परिसरातुन येणारी व गांधी चमन मार्गे नवीन जालन्यात जाणारी वाहतुक ही, जामा मस्जीद ते कैकाडी मोहल्ला मार्गे रामतिर्थ पुलावरुन किंवा गांधी चमन जवळुन पेशवा चौकातून लक्कड कोट मार्गे जाईल व येईल. बसस्थानकाकडून येणारी व फुलंब्री नाट्यगृह तथा वाहतुक शाखा कार्यालय मार्गे सुभाष चौकातुन जुना जालन्यामध्ये जाणारी वाहतुक ही विशाल कॉर्नर मार्गे मोतीबाग जाईल व येईल. बसस्थानकाकडून येणारी व मामा चौक मार्गे तथा पाणीवेस मार्गे छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याकडे जाणारी वाहतुक ही भोकरदन नाका ते कन्हैयानगर बायपास रोड मार्गे मंठा चौफुली जाईल व येईल. छत्रपती शिवाजी महाराज पुतळा चौकाकडुन टांगा स्टँड मार्गे तथा पाणीवेस मार्गे जुना जालन्यात जाणारी वाहतुक ही, मंगळ बाजार ते चमडा बाजार येथून राजमहल टॉकीज पुल मार्गे एमएसईबी जाईल व येईल. नवीन जालन्यातून येणारी व मंमादेवी गांधीचमन ते शनिमंदीर मार्गे नुतन वसाहतीकडे जाणारी वाहतुक ही मंमादेवी जवळुन रेल्वेस्टेशन रोड मार्गे उड्डाणपुल येथून जाईल व येईल. छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ते गुरुबच्चन चौक तसेच नाव्हा चौफुली कडून येणारी व झाशीची राणी चौक मार्गे जेईएस कॉलेज ते बाबुराव चौकाकडे जाणारी वाहतुक ही जिजामाता प्रवेशव्दार ते नाव्हा चौफुली येथून बायपास रोड मार्गे कन्हैयानगर येथे जाईल व येईल. असेही आदेशात नमुद करण्यात आले आहे.