संतनाथबाबा पादुका-समाधी स्थापना संपन्न

पुणे/प्रतिनिधी,दि.26
गंगाधाम परिसरातील साई-विश्वनाथ दरबार येथे गुरुपोर्णिमाचे औचित्य साधुन सद्गुरु श्री संतनाथबाबा यांच्या पादुका -समाधीची स्थापना करण्यात आली.या कार्यक्रमास अनेक भाविकांनी येऊन दर्शन घेतले.व महाप्रसादाचा लाभ घेतला.
दरवर्षी प्रमाणे यावर्षीही गुरुपोर्णिमा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.त्यानिमित्ताने पहाटे अभिषेक,सकाळची आरती,भजन तसेच दुपारी पाद्यपूजन ,धुपआरती व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.स्व.संतोषजी रांका उर्फ सद्गुरु संतनाथबाबा यांचे भाविकांनी स्मरण करुन त्यांच्या पादुकांचे पूजन केले.याप्रसंगी गुरुस्थानी असलेल्या गुरु माऊली आईमाता श्रीमती नीताजी रांका यांचेही पाद्यपूजन करण्यात आले.त्यांनी सर्वांना आशिर्वाद दिले. अनेक भाविकानी त्यांना गुरुपोर्णिमा निमित्ताने मान -सन्मानही अर्पण केला.प.पू. सद्गुरु श्री संतनाथबाबा हे नेहमी हसमुख असत.त्यांना पाहताच दरबारात भाविक दुःख विसरत असत.भाविकांच्या समस्यावर ते अनुभवसिध्द मार्गदर्शन करीत असत.अशा आठवणीचा आढावा अध्यात्मज्ञान प्रसारक आत्माराम ढेकळे यांनी व्यक्त केला.भजन कार्यक्रमात प्रामुख्याने साईराज रांका,प्रणव रांका,एल.के.गुप्ता,शिवसहायसिंह (बनारसवाले),दिलीपसिंह आदींनी सहभाग घेतला.सदरील कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शशिकांत मोरे,महादेव जाधव,नितिन पेठारे,साई शहा,श्रेयश पाटोळे,सुरेश काळे,जितेंद्र गौड आदी भाविक भक्तांनी परिश्रम घेतले.शेवटी सर्वांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.