पुर्वजानी सर्व जातीधर्मासाठी केलेल्या कार्य आचरणात आणावे श्रीमंत भुषण सिंह राजे होळकर

हदगाव/प्रभाकर डुरके,दि.31
हदगांव तालुक्यातील शौर्य भुमी असलेल्या नाव्हा येथे आद्यक्रांतीविर नोवसाजी नाईक हौसाजी नाईक यांचा स्मृती सोहळा बुधवार एकतीस जानेवारी रोजी इंदौर होळकर घराण्याचे वंशज श्रीमंत भुषण सिंह राजे यांच्या अध्यक्षतेखाली उपस्थित मान्यवर ईतिहास प्रेमीच्या उपस्थितीत संपन्न झाला. यावेळी भुषण सिंह राजे यांनी पुर्वजानी सर्व जातीधर्मासाठी कार्य केले आहे.त्यांचे सर्वानीच विचार आचरणात आणावे असे आवाहन केले. ईतिहास प्रेमी प्राध्यापक यशपाल भिंगे यांच्यासह उपस्थित मान्यवरांकडुन नोवसाजी नाईक हौसाजी नाईक यांच्यासह शुरविराचा ईतिहासावर प्रकाश टाकला.तर शौर्य भुमी नाव्हा विकास कामासाठी अपेक्षा व्यक्त केल्या.
यावेळी आमदार माधवराव पाटील जवळगावकर माजी खासदार सुभाषराव वानखेडे, डॉ. अंकुशराव देवसरकर शिवसेना जिल्हाप्रमुख बाबुराव कदम कोहळीकर, माहुरचे मंहत श्याम भारती महाराज प्रकाशराव नाईक बाबुराव हाराळे दिगांबर साखरे भास्कर पंडागळे,शिंदे, पंढरीनाथ ढाले, राजेश फुलारी राजवाडीकर ,अशोकराव नाईक,शशिकांत वडकुते, गोविंद तासके, बालाजी राठोड,बालाजी महाजन नाव्हा सरपंच भास्करराव भिंगार यांच्यासह परिसरातील आजी माजी सरपंच उपसरपंच नाव्हा येथील प्रतिष्ठित नागरिक महिला तालुका जिल्ह्यासह आजुबाजुच्या जिल्ह्यातील इतिहास प्रेमीनी स्मृती सोहळ्याला उपस्थिती लावली.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्राध्यापक कडबे यांनी केले तर आभार डॉ. बि.के.निळे यांनी केले.