राज दौलतशेठ घरत यांनी जपली सामाजिक बांधिलकी स्व खर्चातून केली कचरा साफसफाई

उरण/विठ्ठल ममताबादे,दि.27
सामाजिक कार्यकर्ते हा समाजाचा आधारस्तंभ आहेत. समाजाचा ते एक आदर्श आहेत. असेच प्रकारचा आधार स्तंभ म्हणून उरण तालुक्यातील भाजपचे जेष्ठ नेते तथा नवघर ग्रामपंचायतचे माजी सरपंच दौलतशेठ घरत सर्वांना सुपरिचित आहेत. दौलतशेठ यांनी आजपर्यंत अनेक विकासकामे केली आहेत. जात पात, पक्ष, मतभेद विसरून राजकारणाच्या पलीकडे जाऊन त्यांनी अनेक सामाजिक कार्य केली आहेत. स्वतःच्या खिशातून पैसे खर्च करून जनतेची विकासकामे केली आहेत. त्यामुळे दौलतशेठ सामाजिक कार्यासाठी सर्वत्र प्रसिद्ध आहेत.दौलतशेठ घरत यांच्या पाऊलावर पाऊल टाकत त्यांचे सुपुत्र राज दौलतशेठ घरत यांनी सामाजिक कार्याचा वसा जपला आहे. नवघर गावात अनेक ठिकाणी कचरा साठला होता. अनेक ठिकाणी कचरा रस्त्यावर आला होता. कुत्रे, मांजरे, उंदीर, घूस यासारखे प्राणी यांच्यामुळे कचरा दूर पसरून दुर्गंधी पसरली होती. या दुर्गंधीमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले होते. कचऱ्यामुळे घाणीचे साम्राज्य सर्वत्र पसरले होते.नवघर कमानी जवळ, ग्रामपंचायत जवळ, नवघरचा मागील रस्ता जीडीएल रस्ता, छोटे मोठे गल्ली जिथे घाण साचली होती तिथे स्व: खर्चातून टेम्पो लावून, मजूर लावून कचऱ्याची साफसफाई केली. ८ मजूरांनी सदर केरकचरा काढला. त्या कचऱ्याची विल्हेवाट लावली. सदर कचराचा रिसायकल करून त्या कचऱ्याचा वापर वीज तयार करण्यासाठी केला गेला.राज दौलतशेठ घरत यांनी यापूर्वीही गावात अनेक विकासकामे केली आहेत. नवघर गावात अनेक ठिकाणी अंधाराचे साम्राज्य होते. लोकांना येताना जाताना त्रास होत होता ही समस्या लक्षात येताच राज घरत यांनी स्व: खर्चातून नवघर गावात अनेक ठिकाणी लाईट पोल बसवून दिवे लावले व नागरिकांसाठी प्रकाशाची व्यवस्था केली.कुंडेगाव येथेही प्रकाशाची व्यवस्था केली, पाण्याची पाईपलाईन टाकून जनतेच्या पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली. सिव्हिल इंजिनिअर, सुसंस्कृत, उच्च शिक्षित असलेल्या राज दौलतशेठ घरत यांनी केलेल्या या सामाजिक कार्याचे सर्वच स्तरातून कौतुक करण्यात येत आहे. समाजसेवेची लहानपणा पासून आवड असल्यामुळे अनेक विकासकामे राज घरत यांनी केल्याने जनतेनी, नागरिकांनी त्याच्या कार्याचे कौतुक करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.