बहुचर्चित ‘ अघोरी ‘ चित्रपटाचे पहिले ऑडिशन मुंबईत धडाक्यात संपन्न
दिग्दर्शक गोरख भारसाखळे सह मुख्य कलाकार अभिनेते नटराज मिसाळ आणि अभिनेत्री अनुश्री खांडेकर यांची प्रमुख उपस्थिती!

मुंबई/प्रतिनिधी, दि. 22
मुंबई: बहुचर्चित अघोरी या वेगळ्या आणि नवीन विषयावर दिग्दर्शक गोरख भारसाखळे हे ‘ अघोरी ‘ नावाचा भयानक चित्रपट दिग्दर्शित करीत आहेत दिनांक २१ मे रोजी त्याचे पाहिले ऑडिशन मंगला हायस्कूल,ठाणे येथे अतिशय उत्साहात पार पडले या साठी त्यांनी अभिनेते नटराज मिसाळ आणि अभिनेत्री अनुश्री खांडेकर आणि निर्माती शीतल चौगुले यांची जज म्हणून निवड केली होती.अतिशय उत्साहात संपूर्ण महाराष्ट्रातील कलाकार सकाळी आठ वाजल्यापासून यायला सुरवात झाली होती.ऑडिशन ची वेळ ११ ते ५ असल्याने ११ वाजताच कलाकारांनी गर्दी केली सर्व ऑडिशन पार पाडण्यासाठी अभिनेते गौतम शेळके यांनी अतिशय मेहनत घेतली त्यांनी कलाकारांना फॉर्म देऊन रजिस्ट्रेशन साठी मदत केली तर त्यांच्या मदतीला नितीन सावंत यांनी सुद्धा मदत केली अनेक नवीन जुन्या कलाकारांनी आपली कला सादर केली प्रमुख आकर्षण रात्रीस खेळ चाले फेम अभिनेत्री संजीवनी पाटील या होत्या सुमारे सातशे पेक्षा जास्त कलाकारांनी ऑडिशन साठी हजेरी लावली.यात नांदेड , जालना, बीड ,औरंगाबाद,नाशिक,पुणेमुंबई,ठाणे येथील कलाकारांची संख्या जास्त होती यासाठी अभिनेते सचिन झगडे यांचे बंधू ,अनिता खरात,देवदत्त यांनी ऑडिशन दिले हा चित्रपट अघोरी बाबा वर आधारित असल्याचे दिग्दर्शक गोरख सर यांनी सांगितले.