महाडिबीटी प्रणालीवर शिष्यवृत्तीसाठी ऑनलाईन अर्ज करण्यास 30 जुनपर्यंत मुदत
जालना/प्रतिनिधी,दि.18
सन 2023-24 शैक्षणिक वर्षातील जालना जिल्ह्यातील महाविद्यालयांत प्रवेशित अनुसूचित जाती प्रवर्गातील व भारत सरकार मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती योजनांसाठी पात्र असलेल्या विद्यार्थ्यांचे महाडिबीटी प्रणालीवर ऑनलाईन अर्ज नोंदणी करण्यासाठी दि. 11 ऑक्टोबर 2023 पासून ऑनलाईन प्रणाली सुरु झालेली आहे. तरी ऑनलाईन पध्दतीने अर्ज नोंदणी करण्याची अंतिम मुदत दि. 30 जुन 2024 रोजीपर्यंत आहे.
महाराष्ट्र राज्याच्या समाज कल्याण आयुक्तांनी दिलेल्या निर्देशानूसार जालना जिल्ह्यातील प्रवेशित सर्व उच्चशिक्षीत अद्यापपर्यंत ज्या विद्यार्थ्यांनी अर्ज नोंदणी केली नाही, त्यांनी ऑनलाईन महाडिबीटी प्रणालीवर त्वरीत अर्ज सादर करावेत. तसेच ज्या महाविद्यालयांच्या लॉगिनवर अर्ज विनापडताळणी प्रलंबित आहेत, अशा महाविद्यालयांनी तात्काळ सर्व अर्जाची पडताळणी करुन परिपुर्ण पात्र अर्ज मंजुर करावेत व त्रुटीचे अर्ज विद्यार्थ्याच्या लॉगिनवर पाठवुन त्रुटीपुर्तता करुन घ्यावी व त्यानंतर मंजुर करावेत. ऑनलाईन पध्दतीने अर्ज नोंदणी करण्यासाठी दिनांक 30 जुन 2024 हि अंतीम मुदत असल्याने शासनस्तरावरुन प्रलंबित अर्ज Auto Reject झाल्यास आणि त्यामुळे अनु.जाती प्रवर्गातील विद्यार्थी शिष्यवृत्तीपासुन वंचित राहिल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी संबंधित महाविद्यालयाची राहील, असेही सहायक आयुक्त, समाज कल्याण, जालना यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.