शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील प्रवेश प्रक्रिया सुरु
जालना/प्रतिनिधी,दि.11
इयत्ता दहावी पास-नापास झालेल्या विद्यार्थी व विद्यार्थीनींना शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने सुरू झाली आहे. या केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया पद्धतीने अर्ज भरणे व प्रवेश अर्ज निश्चित करण्याची प्रक्रिया दि.3 ते 30 जुन 2024 रोजी पर्यंत शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था जालना येथे सुरू झालेली आहे.
शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत 2 वर्षाचे अभ्यासक्रम फिटर, मोटर मेकॅनिक व्हेईकल, रेफ्रीजरेशन अॅण्ड एअरकंडिशन टेक्निशिअन, इलेक्ट्रीशिअन, इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक, टर्नर, मशिनिस्ट, ड्राफ्टसमन सिवील, वायरमन तसेच 1 वर्षाचे अभ्यासक्रम कोपा, पत्रे कारागीर, वेल्डर, डिझेल मेकॅनिक, फॅशन टेक्नॉलॉजी, सुईंग टेक्नॉलॉजी या अभ्यासक्रमासाठी एकुण 412 जागा मुला-मुलींना नियमाप्रमाणे ऑनलाईन पद्धतीने दि.30 जुन 2024 प्रवेश निश्चित होणार आहे.
शासकीय आय.टी.आय. जालना येथे 100 मुलांचे राहण्यासाठी वसतिगृह आहे. शासनाकडून नियम व अटीनुसार 500 रुपये दरमहा विद्यावेतन विद्यार्थ्यांना मिळणार आहे. संस्थेमध्ये विद्यार्थ्यांना खेळण्यासाठी मैदान तसेच अभ्यासासाठी अभ्यासिका उपलब्ध आहे. तसेच, प्रवेश घेतलेल्या सर्व विद्यार्थ्यांना रोजगार व स्वयंरोजगार करण्या करीता मार्गदर्शन उपलब्ध राहील. प्रवेश प्रक्रियेच्या अधिक माहितीसाठी शासकीय आय.टी.आय, एस.टी.वर्कशॉप जवळ, चंदनझिरा परिसर, छत्रपती संभाजीनगर रोड, जालना या ठिकाणी प्रत्यक्ष संपर्क साधावा किंवा टोल फ्री क्र. 9067159904 वर संपर्क साधावा. तसेच वेबसाईट www.admission.dvet.gov.in ला भेट द्यावी, असे प्राचार्य, औद्योगिक प्रशिक्षण संस्था, जालना यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.