pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

मोर्शी जवळ जुगार अड्ड्यावर धाड साडेसहा लाखांचा मुद्देमाल जप्त

0 3 1 3 3 3

मोर्शी/प्रतिनिधि,दि.05

      BREAKING NEWS

मोर्शी : मोर्शी येथून जवळच असलेल्या दापोरी जामठी शेत शिवारातील जुगार अड्ड्यावर अमरावतीच्या स्थानिक गुन्हे शाखेने धाड टाकली. या धाडसत्रात सहा जुगाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्यात आली असून, ६ लाख ५२ हजार ८७० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. दरम्यान, अमरावतीच्या पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या सर्व आरोपींना मोर्शी पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.
पोलिसांच्या मते जप्त करण्यात आलेल्या एकूण मुद्देमालात १ लाख ९८ हजार २०० रुपयांची रोख आहे. एवढ्या मोठ्या रकमेचा जुगार पकडण्याची अलिकडच्या काळातील ही पहिलीच घटना आहे.
प्रत्यक्षात दिवसभरात तेथे किती रुपयांची उलाढाल होत असेल, याबाबत वेगवेगळे कयास लावले जात आहेत.गेल्या काही दिवसांपासून मोर्शी पोलिस स्टेशनच्या हद्दीत मोहन प्रकाश निपाने नामक युवकाने दापोरी नजीकच्या जामठी शेत शिवारात जुगार अड्डा थाटला होता. मोहन निपाने याने काही जुगाऱ्यांना एकत्रित करून मध्यप्रदेश सीमेलगत असलेल्या सालबर्डी ते डोंगर यावली दरम्यानच्या शिवारात हा अवैध धंदा सुरु केला होता. दापोरी येथील नितीन विघे यांच्या शेतात बावन पत्त्याचा जुगाराचा खेळ सुरू असल्याची गुप्त माहिती सोमवारी अमरावती येथील स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकास मिळाली होती. त्यानंतर त्यांनी धाड टाकून सहा आरोपींना घटनास्थळावरून अटक केली. कारवाईवेळी एक आरोपी घटनास्थळावरून फरार झाला.अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये रखबिर दारासिंग टाक वय ३३ वर्ष, रा तळेगाव, ता आष्टी, जि. वर्धा अजहरोद्दीन सलीमोददीन वय ३७ वर्ष, रा ब्राम्हणवाडा थडी, ता. चांदूर बाजार पंकज दादाराव भोरखडे वय ४० वर्ष, रा डोंगर यावली, ता. मोर्शी, नुरअली शमसेर अली वय ४४ वर्ष, रा धरम काटयाचे जवळ अमरावती, विजय दिलीप मोरे वय ३२ वर्ष, रा. साई कॉलनी मोर्शी, संदीप सुरेश जहकर वय ३१ वर्ष, रा रामजीबाबा नगर मोर्शी, मोहन प्रकाश निपाने रा. मोर्शी, फरार जुगार चालक यांच्या ताब्यातून रोख रक्कम एक लाख ९८ हजार २०० रुपये, ७ मोटरसायकली व ६ मोबाइल संच आणि जुगाराचे साहित्य असा एकूण ६ लाख ५२ हजार ८७० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पोलीस अधिकारी मोर्शी डॉ. नीलेश पांडे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक तपन कोल्हे यांचे मार्गदर्शनात ही कारवाई करण्.यात आली आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 3 1 3 3 3

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे