कमाल भाडे दरापेक्षा जास्त भाडे आकारणाऱ्या खाजगी प्रवासी बसच्या तक्रारीसाठी हेल्पलाईन

जालना/प्रतिनिधी,दि. 2
जिल्ह्यात व जालना शहरात खाजगी कंत्राटी प्रवासी बसची तपासणी व मनमानी भाडे आकारणीबाबत दि.1 ते 30 सप्टेंबर 2024 या कालावधीत विशेष तपासणी मोहिम राबविण्यात येणार आहे. मोटार वाहन कायदा व त्याखालील तरतुदींचा भंग करणाऱ्या खाजगी बस धारकांविरुध्द कारवाई करण्यात येणार आहे. मनमानी भाडे आकारणाऱ्या कंत्राटी बस धारकांविरुध्द तक्रार करण्यासाठी जालना उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयाकडून हेल्पलाईन क्रमांक 02482 220480 तसेच ई-मेल dyrto.21-mh@gov.in कार्यान्वित करण्यात आला आहे. तरी जिल्ह्यातील नागरिकांनी खाजगी कंत्राटी बस धारकांकडून प्रवासासाठी जादा भाडे आकारणी केल्यास तक्रार नोंदवावी, असे आवाहन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी जालना यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.