सिने अभिनेते एम.नटराज यांचा नवीन होम मिनिस्टर कार्यक्रम मुंबई गाजवून आता सादर होतोय संपूर्ण महाराष्ट्रात!

जालना/प्रतिनिधी, दि.18
सिने अभिनेते एम.नटराज यांनी मराठी चित्रपट आणि मालिका मधुन अभिनय सादर केल्यानंतर त्यांनी काहीतरी नवीन आणि वेगळे करण्याचे ठरवले आणि खुप विचार केल्यानंतर त्यांनी नवीन होम मिनिस्टर कार्यक्रम तयार करण्याचे ठरवले त्यासाठी त्यांनी अनेक होम मिनिस्टर कार्यक्रम बघितले आणि त्यांनी नवीन होम मिनिस्टर कार्यक्रम सादर करण्यासाठी नवीन मनोरंजनात्मक खेळ घेऊन सुरवात केली नवीन असल्याने पहिला शो सादर करताना खुप भीती वाटत होती पण हळू हळू सराव होत गेला तशी तशी त्यांच्या मनातील भीती सुद्धा कमी होत गेली.आणि आज परिस्थिती अशी आहे की कुणाला तारीख देताना विचार करावा लागतो कारण त्यांचे चित्रपटांचे शूटिंग सुद्धा चालु असते आज त्यांच्या कार्यक्रमाची दखल घेत त्यांना वाई जिल्हा सातारा येथे नवीन होम मिनिस्टर कार्यक्रम सादर करण्याची संधी मिळाली आणि प्रचंड गर्दीत आणि उत्साहात त्यांनी वाई येथे नवीन होम मिनिस्टर कार्यक्रम सादर केला हा कार्यक्रम बघून त्यांना कोल्हापूर,बुलढाणा अहमदनगर जिल्हा मधुन सुद्धा नवीन होम मिनिस्टर कार्यक्रम सादर करण्यासाठी बोलावले आहे लवकरच त्यांचा भटकती आत्मा हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे.