‘आय लव्ह कुरचुंब’ गावाच्या नवीन नामफलकाचा अनावरण कार्यक्रम सोहळा झाला मोठ्या उत्साहात संपन्न !

उरण/विठ्ठल ममताबादे,दि.19
आज काल शहरीकरणाच्या आणि विकासाच्या नावाखाली गावंच्या – गावं उध्वस्त केली जात आहेत आणि हे सर्व पाहता ” माझा गाव माझा अभिमान ” ! ही संकल्पना उराशी बाळगत आज पर्यंत उरण पनवेल तालुक्यातील अनेक गावांना त्यांच्या गावांच्या नावांचे बोधचिन्ह अर्थात विद्युत रोषणाईने चमकणाऱ्या नावांचे नवीन नामफलक बनवून देण्याचं औदार्य ज्यांच्या मनाच्या मोठेपणातून साकारलं गेलं असे दानशूर व्यक्तिमत्त्व केअर ऑफ नेचर सामाजिक संस्थेचे संस्थापक महाराष्ट्र भूषण राजू मुंबईकर यांच्या संकल्परुपी औदार्यातून आज रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा तालुक्यातील पंचक्रोशीत आदर्शवत कुरचुंब गावात पुरातन शिवमंदिर श्री गांगेश्वराच्या पावन पवित्र भूमीत आय लव्ह कुरचुंब या नावाचं विद्युत रोषणाईने चमकणारे नूतन नामफलक बनऊन देण्यात आले त्या नूतन नामफलकाच्या अनावरण सोहळा कार्यक्रमाचे आयोजन कुरचुंब गावचे सामाजिक कार्यकर्ते आणि कुरचुंब विकास मंडळ मुंबईचे सचिव नारायणजी माने आणि ग्रामस्थांच्या वतीने कुरचुंब गावात करण्यात आले. आज पर्यंत उरण,पनवेल,पेण तालुक्यातील अनेक गावांच्या नावांच्या नामफलकांचे लोकार्पण करण्यात आले.पण आज रत्नागिरी सारख्या जिल्ह्यात सुध्दा नूतन नामफलकाचे अनावरण करून खऱ्या अर्थाने राजू मुंबईकर आपल्या सामाजिक कार्याच्या झंझावात रत्नागिरी जिल्ह्यापर्यंत पोहचवला आहे.तर इतर अनेक गावांच्या नावांचे बोधचिन्ह नामफलक तयार बनवून अनावरण करण्याच्या प्रतीक्षेत आहेत आज पर्यंत राजू मुंबईकर यांनी अनेक सामाजिक कार्यांच्या माध्यमातून समाजात आपल्या नावाचा एक वेगळाच ठसा उमटविला आहे आणि ह्याच सामाजिक संस्कारांच्या विचाराने प्रेरित होऊन त्यांच्या औदार्यातून आज हे सुंदर कार्य साकारलं गेलं !.
कुरचुंब गावचे सामाजिक कार्यकर्ते नारायणजी माने यांच्या मागणीच्या विनंतीला मान देतं कुरचुंब गावांच विद्युत रोषणाईने चमकणारे नामफलक बनवून देण्याचं प्रेरणादायी कार्य साकारण्यात आले ह्या कार्यक्रमाच्या अनावरण सोहळा कार्यक्रमा प्रसंगी पाहुण्यांचे स्वागत अगदी जंगी पद्धतीने करण्यात आले.कार्यक्रमा दरम्यान आपलं मनोगत व्यक्त करताना राजू मुंबईकर यांनी म्हटलं की विकासाच्या नावाखाली उध्वस्त होणारी गावं पहिली आणि माझा गावं माझा अभिमान ही संकल्पना मनात आली आणि ती प्रत्यक्षात उतरविण्याचा संकल्प केला त्यातूनच आज पर्यंत अनेक गावांच्या नावाचे नामफलक ( बोधचिन्ह ) बनऊन देण्यात आले.
केअर ऑफ नेचर सामाजिक संस्थेचे संस्थापक राजू मुंबईकर यांच्या सौजन्याने आणि कुरचुंब गावचे सामाजिक कार्यकर्ते कुरचुंब विकास मंडळ मुंबईचे सचिव नारायणजी माने यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या कुरचुंब ह्या गावांत आय लव्ह कुरचुंब या नवीन नामफलकाच्या अनावरण सोहळ्या प्रसंगी या कार्यक्रमा करिता प्रमुख मान्यवर म्हणून महाराष्ट्र भूषण राजू मुंबईकर, संदेशजी घरत, संपेशजी पाटील सोबतच कुरचुंब गावचे सरपंच प्रसादजी माने उपसरपंच अनिल सुवारे मानकरी दत्ता माने,चंद्रकांत माने,जगन्नाथ माने,द्वारकानाथ माने, जगन्नाथ गुरव,विष्णू गुरव,शैलेश गुरव, रघु गुरव, अनंत माने, शेखर शिंदे, मंगेश माने, मोहन माने, विश्वास खामकर,पप्पू माने, पद्या पास्टे, चंद्या माने,अनिकेत माने यांची उपस्थिती लाभली.कुरचुंब गावांतील ग्रामास्थ आणि महिला भगिनिंच्या मोठ्या उपस्थितीत ह्या विद्युत रोषणाईने चमकणाऱ्या नवीन नामफलकाचा अनावरण कार्यक्रम सोहळा मोठ्या उत्साहात आणि उत्तम प्रतिसादात संपन्न झाला.