बीड येथील पत्रकार जितेंद्र शिरसाठ यांना गौण खनिज विभातील कर्मचाऱ्यानी फोन वर धमकी दिल्या बद्दल जिल्हा अधिकारी, जालना यांना निवेदन.
संबधीत कर्मचाऱ्यावर कार्यवाही करण्यात यावी. जितेंद्र गाडेकर,जेष्ठ पत्रकार व प्रेस संपादक पत्रकार सेवा संघांचे जिल्हा अध्यक्ष यांची मागणी

जालना/प्रतिनिधी, दि.24
दै. वास्तव चे संपादक जितेंद्र सिरसाट यांना बीड जिल्हाधिकारी कार्यालयातील मुजोर कर्मचारी श्रीमती आघाव मॅडम यांनी बातमी लावल्याचा आकस मनात धरून धमकी व मुजोरीची भाषा वापरल्याने त्यांच्याविरुद्ध पत्रकार कायद्यानुसार कारवाई करणे बाबद निवेदन करण्यात आले.
वरील विषयी सविस्तर माहिती अशी ,बीड येथील जिल्हाधिकारी कार्यालय मधील गौण खनिज विभागात कार्यरत असणाऱ्या श्रीमती आघाव मॅडम यांनी सांज दै. बीड वास्तवचे निष्कलंक व चारित्र्यवान असे संपादक पत्रकार जितेंद्र सिरसाट यांनी गौण खनिज विभागातील सावळ्या गोंधळा बाबत त्यांच्या वर्तमान पत्रातुन बातमी प्रकाशित केल्याचा आकस मनात धरून त्यांना फोनवर एकेरी व अरेरावीची भाषा करून धमकी दिली ही अत्यंत निंदनीय बाब आहे. या अशा मुजोर कर्मचाऱ्याकडून लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेल्या संपादक व पत्रकार यांच्या स्वातंत्र्यावर गदा आणण्याचा प्रकार झालेला आसल्याने आम्ही या घटनेचा प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ महाराष्ट्र राज्य या संघटनेच्या जालना जिल्हा शाखेच्या वतीने प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या प्रिंट व इलेक्ट्रॉनिक मीडिया प्रतिनिधी व पत्रकार संघटनेच्या वतीने प्रथम जाहिर निषेध करून बीड जिल्हाधिकारी कार्यालयात गौण खनिज विभागात कार्यरत असणाऱ्या मुजोर कर्मचारी श्रीमती आघाव मॅडम यांच्यावर पत्रकार संरक्षण कायद्यानुसार कारवाई करून त्यांना शासन सेवेतून तात्काळ निलंबित करन्यात यावे असे निवेदन करण्यात आले.