ब्रेकिंग
जालन्यात भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त पालकमंत्री श्रीमती पंकजा प्रज्ञा गोपीनाथ मुंडे यांच्या हस्ते होणार मुख्य शासकीय ध्वजारोहण

0
3
1
3
4
4
जालना/प्रतिनिधी,दि.25
76 व्या भारतीय प्रजासत्ताक दिन समारंभानिमित्त रविवार दि.26 जानेवारी 2025 रोजी राज्याच्या पर्यावरण व वातावरणीय बदल, पशुसवंर्धन मंत्री तथा जालना जिल्ह्याच्या पालकमंत्री श्रीमती पंकजा प्रज्ञा गोपीनाथ मुंडे यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहणाचा कार्यक्रम सकाळी 9.15 वाजता जालना येथील पोलिस मुख्यालयाच्या मैदानावर होणार आहे. तरी नागरिकांनी तसेच सर्व शासकीय, निमशासकीय आणि सहकारी संस्थेच्या कार्यालयातील अधिकारी-कर्मचाऱ्यांनी राष्ट्रीय पोषाखात ध्वजारोहणास उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.श्रीकृष्ण पांचाळ यांनी केले आहे.
0
3
1
3
4
4