प्रा डॉ नवगणकर, प्रा. तडस प्रा डॉ भालेराव यांची राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी म्हणून नियुक्ती

हिंगोली/प्रतिनिधी, दि.24
सेनगाव येथील तोष्णीवाल कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात दिनांक 23/08/ 2024 शुक्रवार रोजी महाविद्यालय प्रशासनाच्या वतीने शैक्षणिक वर्ष 2024 -25 पासून पूर्वापार कार्यरत असलेले राष्ट्रीय सेवा योजना विभागाद्वारे वर्षभर चालत राहणाऱ्या प्रबोधन पर कार्यक्रमाच्या नियोजनासाठी जसे की, स्वच्छ भारत अभियान, मतदान जागृती, वृक्षारोपण संगोपन व संवर्धन एचआयव्ही जनजागृती रॅली आरोग्य विषयक सल्ला व मार्गदर्शन, भारतीय संविधान दिन, राष्ट्रसंतांचे स्मृतिदिन व सायबर सुरक्षा आदी बाबींच्या नियोजनासाठी प्रा डॉ नवगणकर, प्रा पी टी तडस आणि प्रा डॉ जी पी भालेराव यांची राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी पदी नियुक्ती करण्यात आली या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. एस जी तळणीकर तर प्रमुख उपस्थितीमध्ये माजी कार्यक्रमाधिकारी प्रा यू पी सुपारी, डॉ संजीव कुमार अग्रवाल डॉ उदय साहू,डॉ एस आर पजई, डॉ. डी.एस. धारवाडकर, प्रा. बाळासाहेब गायकवाड, डॉ साहू, डॉ. विकास कल्याणकर, प्रा टी यु केंद्रे, आदी मान्यवर मंडळी उपस्थित होती. प्राचार्यांनी याप्रसंगी राष्ट्रीय सेवा योजनेची कार्य परिसरातील गावापर्यंत वाढविण्यासाठी प्रयत्नशील राहावे. असे आव्हान केले