आयुर्वेदिक डॉक्टरांना प्रॅक्टीस करताना
येणार्या अडचणी व त्यांच्या समस्यांबाबत निराकारण व्हावे, म्हणून केंद्रीय आयुष खात्याचे मंत्री प्रतापराव जाधव यांची भेट घेऊन या बाबतचे निवेदन बदनापूर येथील डॉक्टर असोशिएशनचे अध्यक्ष डॉ. अरूण खैरे यांनी दिले.देशभरात बीएएमएस डॉक्टरांची मोठी संख्या असून आयुष खात्यामार्फत विविध सोयी सुविधा आयुर्वेद प्रचारासाठी करण्यात येतात. बीएएमएस डॉक्टर
आयुर्वेदिक प्रॅक्टीस बरोबर आधुनिक प्रॅक्टीस करत असतात. मात्र,स्थानिक ठिकाणी त्यांना काही समस्यांचाही सामना करावा लागतो. तसेच आयुष
विभागाच्या अनेक योजनांचा लाभ तळागाळापर्यंत पोहोचावा या हेतूने बदनापूर येथील डॉ. अरूण खैरे यांनी पुढाकार घेऊन एक संस्था तयार केलेली असून या
संस्थेत देशभरातील नावाजलेले आयुर्वेदिक डॉक्टरांनी समिती सदस्य म्हणून नियुक्ती केली आहे. ही समिती आयुष विभाग व सर्वसामान्य नागरिकांमध्ये
समन्वय साधण्याचे काम करणार असून येणार्या समस्यांची ही उकल करण्याचा प्रयत्न करणार आहे.
या बाबत बदनापूर डॉक्टर असोशिएशनचे अध्यक्ष डॉ. अरूण खैरे यांनी नुकतेच आयुष विभागाचे केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांची समक्ष भेट घेऊन
याबाबत चर्चा केली. या वेळी मोठया संख्येने आयुर्वेदिक डॉक्टरांची उपस्थिती होती.