आर्य समाज ग्रंथालयाच्या वतीने लेखक वक्ते राजेश दिवटे यांचा सन्मान

पाटोदा/नितिन भोंडवे,दि.15
आर्या समाज ग्रंथालय व मोफत वाचनालयाच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय श्रावणधरा काव्यसंध्या या कार्यक्रमांमध्ये यशवंती प्रेरणादायी सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष लेखक प्रेरणादायी वक्ते, कवी राजेश दिवटे यांनी आपल्या शेतकऱ्यांच्या प्रश्नावर कविता सादर केली. या कवितेला पाहुण्यांनी व सभागृहातील उपस्थित काव्यप्रेमींनी भरभरून प्रतिसाद दिला. यावेळी व्यासपीठावर प्रमुख पाहुणे प्राध्यापक डॉ. राजकुमार यलवाड, मुंबई आकाशवाणी केंद्राचे अधिकारी श्री. अनिल कुमार पिंगळे, प्रसिद्ध कवियत्री मंजिरी सरदेशमुख, ग्रंथालयाचे विश्वस्त उत्तमराव दंडीमे साहेब यांनी राजेश दिवटे यांचा गोल्ड मेडल, सन्मानपत्र, ग्रंथ, देऊन सन्मान केला
या कार्यक्रमाचे मुख्य संयोजक मुरलीधर सुंदराणी, श्री सुरेंद्र करमचंदानी, श्री दिनेश यादव, कार्यक्रमाचे उत्कृष्ट सूत्रसंचालन प्रसिद्ध निवेदक राजेंद्र सगर यांनी केले. हा कार्यक्रम आर्य समाज पिंपरी येथील सभागृहामध्ये पार पडला