वाढदिवसानिमित्त शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप

हदगाव/प्रभाकर डुरके,दि.18
काहीजण वाढदिवसावर विविध प्रकारे अनाठायी खर्च करण्याची चढाओढ करीत आहेत.तर काही जण आपला वाढदिवस विविध सामाजिक धार्मिक कार्याने करतात.
मनाठा येथील सामाजिक कार्यकर्ते शैलेश बोईनवाड यांनी आपले वडील दिवंगत बालाजी बोईनवाड यांनी शिक्षक म्हणून काम केलेल्या मनाठा येथील बापूराव पाटील आष्टीकर प्राथमिक शाळेत शैलेश बोईनवाड यांनी आपल्या मुलाच्या कियान च्या प्रथम वाढदिवसानिमित्त व मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त बोईनवाड कुटुंबाच्या वतीने शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य देत सामाजिक उपक्रम राबवित वाढदिवस साजरा केला. या अभिनव उपक्रमाचे कौतुक व्यक्त करीत आहेत.
यावेळी आदर्श विद्यालयाचे मुख्याध्यापक बाळासाहेब नाईक,बापूराव पाटील आष्टीकर प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक सुरेश कावळे, सह शिक्षक अनिल पाध्ये,भोजनकर,आणि अविनाश बोईनवाड,यांच्यासह त्यांचे कुटुंबीय उपस्थित होते.