ब्रेकिंग
पीएम श्री जवाहर नवोदय विद्यालय आंबा – परतूर (जालना) येथे महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना ‘महापरिनिर्वाण दिनानिमित्त’ अभिवादन .
0
3
1
3
1
1
जालना/जितेंद्र गाडेकर,दि.6
आंबा परतुर – पीएम श्री जवाहर नवोदय विद्यालय आंबा येथे दिनांक 6/ 12/ 2023 रोजी महापरिनिर्वाण दिन साजरा करण्यात आला. याप्रसंगी विद्यालयाचे प्रभारी प्राचार्य श्री आर जी मस्के सर यांनी भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून माल्यार्पण केले. यावेळी सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी प्रतिमेला अभिवादन केले . विद्यालयातील प्राध्यापक श्री कैलास रेगर यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनाबद्दल माहिती दिली . विद्यालयाचे प्रभारी प्राचार्य श्री.आर जी मस्के सर यांनी याप्रसंगी विद्यार्थ्यांना डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी समाजासाठी केलेल्या अमूल्य योगदानाची जाणीव करून दिली.
0
3
1
3
1
1