कर्जत येथील राजुरेश्वर मध्ये ‘सर्प आपला मित्र’ जनजागृती पर कार्यक्रम
साप मारण्यापेक्षा वाचवण्यात खरा आनंद - सर्पमित्र दिपक चांदर.

बदनापूर/प्रतिनिधी,दि.10
अंबड तालुक्यातील राजुरेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय कर्जत येथे आज नागपंचमी निमित्त जनजागृती पर कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
राष्ट्रीय हरित सेना अंतर्गत वसुंधरा निसर्ग मंडळाच्या वतीने आयोजित कार्यक्रमात सर्पमित्र दिपक चांदर यांनी विद्यार्थ्यांना नाग, मण्यार, घोणस, फुरसे,धामण,चापडा, डुरक्या घोणस,मांजर्या साप,मांडुळ, कवड्या साप अशा सापांच्या प्रजाती, प्रामुख्याने आढळण्याचे ठिकाण, आकार, लांबी, रंगसंगती,शरीर रचना, प्रजनन,खाद्य, वैशिष्ट्ये, सर्पदंशाची लक्षणे,सर्पदंशावर उपाययोजना,समज-गैरसमज, सापांविषयीच्या अंधश्रद्धा याविषयी प्रात्यक्षिकासह सविस्तरपणे सादरीकरण केले. विद्यार्थ्यांच्या मनातील प्रश्नांची उत्तरे देऊन जनजागृती करण्यात आली.तसेच विद्यालयातील जहेन शरीफ शेख याने तयार केलेल्या सर्प माझा मित्र या भित्तीपत्रकाचे विमोचन करण्यात आले.
याप्रसंगी प्रमुख पाहुणे श्री सचिन आव्हाड,,श्री सानप तर कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य श्री विलास टकले , तर यावेळी प्रा.ओमप्रकाश घुगे ,प्रा.सुभाष जिगे ,प्रा.भरत शेरे , अंकुश वीर ,धनाजी जाधव , वसुंधरा निसर्ग मंडळ प्रमुख सचिन टेकाळे , सुनिल चव्हाण , सुंदर बुनगे , ज्ञानेश्वर पैठणे ,वैभव मुळी , अभिजीत उंडे ,भिकण कोकणी ,अशोक उगले, मनोहर मिसाळ,विलास घुले, वाल्मिक सपकाळ,विष्णू घुगे,पालक , विद्यार्थी उपस्थित होते.