pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

आदिवासी विकासाच्या योजना प्रभावीपणे राबवाव्यात केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ.भागवत कराड

0 3 1 3 1 1

छ.संभाजीनगर/आनिल वाढोणकर,दि.11

जिल्ह्यातील आदिवासी पाड्यावरील आदिवासीनां घरकुल, रस्ते, पाणी ,वीज, शिक्षण, सुविधा सोबतच आर्थिक विकासाच्या योजनाचा लाभ प्रशासनाने द्यावा. असे निर्देश केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ.भागवत कराड यांनी आदिवासी विभागाच्या आढावा बैठकीत दिले. या बैठकीस जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय, आदिवासी विभागाच्या प्रकल्प अधिकारी देवकन्या बोकडे, निवासी उपजिल्हाधिकारी जनार्दन विधाते, माजी महापौर बापु घडामोडे , भाजपा जिल्हाउपाध्यक्ष संजय खंबायते , जिल्हापरिषद सदस्य किशोरआबा पवार , तालुकाअध्यक्ष भगवान कोल्हे उत्तमराव राठौड , तालुकासरचिटणीस सुभाष काळे , गणेश घुगे ,उपविभागीय अधिकारी ज्ञानेश्वर रोडगे, तहसिलदार विधाधर कवडकर ,सतीश सोनी, अप्पर तहसिलदार विजय चव्हाण, नाबार्डचे जिल्हा विकास प्रबंधक सुरेश पटवे,यांच्यासह आदिवासी साठी काम करणाऱ्या सामाजिक कार्यकत्यांची खेमा मधे , पांडुगग कदाळे , बाळु पथवे , कचरु सामंत , कुष्णा सोले , सुरेश राऊत , संदिप निकम , उपस्थिती होती. जिल्ह्यातील कन्नड, खुलताबाद, गंगापुर, वैजापुर या तालुक्यामधील आदिवासींना जात प्रमाणपत्र उपलब्ध करुन देण्याबरोबरच त्यांना रस्ते, अंगणवाडी, प्राथमिक शाळा, प्राथमिक आरोग्य केंद्र स्माशनभूमी या साठी प्रस्ताव सादर करण्याचे आदिवासी विभाग व संबंधित तहसिलदार यांना डॉ.कराड यांनी सांगितले. आदिवासी पाड्यावर घरकुल, वीज, पथदिवे, पिण्याचे पाणी, एकलव्य शाळा, उपलब्ध करण्यासाठी आदिवासी साठी काम करणाऱ्या सामाजिक कायकर्ते यांची मदत घेऊन सुविधा उपलब्ध करण्याबाबत सांगितले. या सर्व सुविधासाठी जिल्हा नियोजन समिती मधून 5 कोटी रुपयांची निधीची तरतूद करण्याचे व तो निधी आदिवासी विभागाला उपलब्ध करुन देण्याचे जिल्हाधिकारी यांना डॉ.कराड यांनी सुचित केले.
उज्वला गॅस जोडणी अंतर्गत गॅसची जोडणी आणि तरुणांना शिक्षण,व रोजगार उपलब्ध करुन देण्यासाठी आदिवासी विभागाने प्रस्ताव सादर करावेत. वैयक्तिक आणि सामुहिक लाभाच्या योजनेचा आढावा घेऊन जास्तीत जास्त आदिवासीना विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी निधी उपलब्ध करुन दिला जाईल. हा निधी आदिवासी विभागाने योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्याबाबतचे निर्देश कराड यांनी दिले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 3 1 3 1 1

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे