चला संविधानाचा मिळुन जागर करुया…!
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या राज्यघटनेचा अमृत महोत्सव सुरूआहे, त्यानिमित्ताने संविधानाचा गजर घराघरात पोहोचावा, यासाठी ९ ऑगस्ट ते ८ सप्टेंबर या काळात सत्याग्रह भूमी – महाड ते चैत्यभूमी दादर, मुंबई (मार्गे महाराष्ट्रातील सर्व जिल्हे) अशी संविधान जागर यात्रा काढण्यात आली आहे. हि यात्रा शनिवार दि. २४ ऑगस्ट २०२४ रोजी जालना शहरात दाखल झाली.
यावेळी जालना विधानसभा प्रमुख भास्करआबा दानवे यांनी भव्य स्वागत करून, साविधान यात्रा जागर समिती, जालना च्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृह टाऊन हॉल येथे जाहीर सभा घेण्यात आली. याप्रसंगी ॲड. वाल्मीक निकाळजे, राजेंद्र गायकवाड, राजकुमार बडोले, नितीन मोरे, मिलिंद इनामदार, काश्यप साळुंके, धम्मपाल मेश्राम, योजनाताई ठोकळे स्नेहाताई भालेराव, संजय कांबळे, ॲड. क्षितीज गायकवाड, राजू माने, विजय गव्हाळे, मिलिंद नाखले, डॉ.विजय मोरे, आकाश अंभोरे, नागसेन पुंडगे यांच्यासारखे प्रख्यात संविधान अभ्यासक व विचारवंत उपस्थित होते. तसेच अशोकआण्णा पांगारकर, सिद्धिविनायकजी मुळे, डॉक्टर दिलीप अर्जुने, शुभांगी देशपांडे यांच्यासह जालना साविधान यात्रा जागर समितीचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.