अनुसूचित जमातीत समावेशासह पंढरपूर येथील उपोषणास पाठिंब्यासाठी धनगर समाजाचे निवेदन

हदगाव/प्रभाकर डुरके,दि.23
धनगर जमातीला अनुसूचित जमातीत समावेश करण्याचा गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या प्रश्नासह याविषयावरील मागणीसाठी पंढरपूर येथे समाज बांधवाचे सुरु असलेल्या उपोषणाला पाठिंबा म्हणून हदगांव तालुक्यातील सकल धनगर समाज बांधवाच्या वतीने सोमवार तेवीस सप्टेंबर रोजी आपल्या भावना शासन दरबारी व्यक्त करण्यासाठी हदगांव तहसील कार्यालयात तहसीलदार विनोद गुंडमवार यांना लेखी निवेदन दिले.
यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य दिगांबर साखरे,माजी पंचायत समीती सदस्य राजेश फुलारी राजवाडीकर , डाॅ.बि.के.निळे ,पंतीगराव मस्के , मारोतराव हुलकाने, भिमराव नरोटे , नागोराव डोलनार बरडशेवाळेकर, ञानेश्वर साखरे सरपंच, सुर्यकांत सरोदे पिंपरखेडकर ,संतोष मस्के केदारनाथ,श्रीनिवास हुलकाने , गजानन सुकापुरे प्रभाकर दहिभाते प्रभाकर डुरके सचिन मुगटकर गजानन लकडे अवधूत चोंढेकर रुईकर विठ्ठलराव मस्के पळसेकर कुलदीप मस्के सुनील साखरे गंगाधर शंकरराव मस्के विठ्ठल गडदे तुकाराम साखरे डिगांबर काळे ओमप्रकाश लकडे दाजीबा साखरे नामदेव सरोदे प्रभाकर जांरडे ञानेश्वर बाभळे किशनराव कांबळे संतोष वाघमारे कैलास तलवारे रामेश्वर हुलकाने यांच्यासह समाज बांधव उपस्थित होते.