झोलर लघुपट देणार नवीन कलाकारांना ओळख. अभिनेते एम.नटराज प्रथमच नवोदित कलाकार सोबत 25 ऑगस्ट ला आपल्या भेटीस

जालना/प्रतिनिधी, दि.14
अथक प्रयत्नांनी दिग्दर्शक विकी हरनामे अखेर यांनी त्यांनी दिग्दर्शित केलेला झोलर हा चित्रपट पूर्ण केला,थोडे जुने जास्त नवीन कलाकार सोबत घेऊन त्यांनी हा लघुपट पूर्ण केला कलाकार नवीन असल्याने खुप अडचणी आल्या कलाकारांची आधी रिहर्सल घेऊन नंतरच शुट करण्यात आले त्यामुळे जास्त टेक घेण्याची गरज पडली नाही सामाजिक कार्यकर्ते यांनी पण या लघु चित्रपट साठी योगदान दिले आहे मिमिक्री आर्टिस्ट,हास्य कलाकार आशिष सातपुते सर यांनी रिहर्सल साठी मोफत हॉल उपलब्ध करून देऊन मोलाचे सहकार्य केले आहे तर बाकी प्रत्येक कलाकारांनी आपला चित्रपट समजून काही ना काही योगदान दिले आहे या लघु चित्रपट ची कथा शुभम कडलाक यांची असून निर्माता दिग्दर्शक विकी हरनामे हे युवा दिग्दर्शक आहेत नवीन असुन सुद्धा विकी हरनामे यांनी उत्तम दिग्दर्शन केले आहे या लघु चित्रपट मध्ये हास्य कलाकार आशिष सातपुते यांनी केलेली कॉमेडी आणि अभिनेते एम.नटराज यांनी साकारलेली भावनिक भुमिका प्रेक्षकांची मने जिंकतील यात शंकाच नाही.या चित्रपटात सर्व नवोदित कलाकारांनी आपली भूमिका उत्तम बजावली आहे हा लघु चित्रपट 25 ऑगस्ट ला
O.C. Production या You Tube चॅनल सर्वांना बघायला मिळेल.