डोली बॉक्सिंग असोसिएशन च्या कार्यालयाचे उद्घाटन संपन्न

जालना/प्रतिनिधी,दि.23
जालना जिल्ह्यातील युवक व युवतींना बॉक्सिंग चे शात्रशुद्ध प्रशिक्षण देण्यासाठी आज जागतिक ऑलिम्पिक दिनाच्या निमित्ताने डोली बॉक्सिंग असोसिएशन च्या कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले.
सदर उद्घाटन जिल्हा क्रीडा अधिकारी अरविंद विध्यागर यांच्या हस्ते करण्यात आले, यावेळी त्यांच्या सोबत डॉ. शिर्के, ऑलिम्पिक संघटनेचे सचिव शेख चाँद पी.जे., गणेश विधाते यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी बॉक्सिंग प्रशिक्षक प्रशांत राजेश्वर डोली यांनी उपस्थित मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
यावेळी बोलताना जिल्हा क्रीडा अधिकारी अरविंद विध्यागर यांनी सांगितले की, बॉक्सिंग हा ऑलिम्पिक स्तराचा खेळ असून खेळाडूंना यात अनेक संधी उपलब्ध आहेत.
प्रशिक्षक डोली यांनी सांगितले की या असोसिएशन च्या माध्यमातून केवळ शहरी नव्हे तर ग्रामीण भागातील युवक व युवतींना शास्त्र शुद्ध प्रशिक्षण देण्यात येणार असून जालना जिल्ह्याचे नाव राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर नेण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील.
कार्यक्रमासाठी युवराज गाडेकर, गोवर्धन वाहुल, नितीन जाधव, शेख इर्शाद, सुनील खांदे, गणेश भगत यांची उपस्थिती होती