४०० हून अधिक काळ भक्कम पणे,अभिमानाने गावची साक्ष देणारे मोठीजुई गावातील पिंपळाचे झाड कोसळले.
मोठीजुई गावात अनेक ठिकाणी लाईटचे खांब कोसळले,गावातील विद्युत पुरवठा खंडित. एका इको वाहनाचे आणि बाजूच्या दुकानांचे नुकसान; उरणच्या मोठीजुई मधील घटना. पंचनामा करून शासनाने त्वरित नुकसान भरपाई द्यावे. जनतेची मागणी.

उरण/विठ्ठल ममताबादे,दि.2
उरण तालुक्यातील मोठी जुई गावात मोठ्या मनाचं ठीसूळ दगडावर वसलेलं जुन्या रूढी परंपरा जोपसणारं ईश्वर प्रेमी गाव अशी ओळख असणाऱ्या गावची साक्ष देणारा ४०० हून अधीक वर्षांपेक्षा जुने असलेल पिंपळाचे झाड कोसळल्याची घटना सोमवारी (ता.०१) रात्री घडली. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र झाडाखाली उभ्या असलेल्या काही वाहनांचे आणि दुकानांचे नुकसान झाले. हे झाड गावची एक वेगळी ओळख असल्याने ही बातमी कानावर पडताच गावातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत पडलेल्या झाडाची अवस्था बघून दुःख व्यक्त केलं, आणि ह्याच जागेवर पुन्हा पिंपळाच झाड लावण्याचा निर्धार व्यक्त केला. हे झाड पडल्याने गावातील ये जा करणाऱ्या वाहनांची रहदारी ठप्प झाली आहे, या सोबत मोठीजुई गावातील बहुतेक ठिकाणी लाईटचे खांब देखील पडले असल्याने गावातील विद्युत पुरवठा खंडित झाला आहे, लाईटचे खांब त्वरित लावून वीज पुरवठा पूर्ववत करण्याची जनतेतून मागणी होत आहे, त्यामुळे एमएसईबी ने या ठिकाणी त्वरित लक्ष देणे गरजेचे आहे.
मध्यरात्री च्या वेळी ह्या घटना घडल्याने मोठी जीवितहानी टळली आहे.झाडाच्या आजूबाजूला काँक्रीटीकरणामुळे झाडाच्या मुळाची पकड सैल झाली होती,आणि रात्री खूप जोराचा वारा होता त्यामुळे हे महाकाय जुनं झाड कोसळले,मात्र कित्तेक वर्षे आम्हाला मोफत ऑक्सिजन देणारं आमचा आधार गेला आहे,तसेंच आमचा प्राण गमावल्याची भावना मोठीजुई गावचे रहिवासी व्यक्त करीत आहेत.ज्या ज्या नागरिकांचे या घटनेमुळे आर्थिक नुकसान झाले आहे त्या नागरिकांना आर्थिक नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी जनतेतून केली जात आहे. त्वरित पंचनामा करून या नुकसान ग्रस्त नागरिकांना शासनाने आर्थिक मदत करून न्याय द्यावा अशी मागणी होत आहे.