शाळा मास्तरांनी केले तीन अल्पवयीन विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार.
मास्तर ला केले तडकाफडकी निलंबित. सिंदखेड राजा तालुक्यातील घटना.

जालना/जितेंद्र गाडेकर,दि.24
विद्यामंदिरात विद्या दानाचे कार्य सोडून चिमुकल्या विद्यार्थिनी सोबत असभ्य वर्तन करणाऱ्या एका मास्तरने संताप जनक कृत्य केले. आधीच देशात महिला सुरक्षा वरून संताप उसळलेला आहे. सिंदखेड राजा तालुक्यातील वर्दडी बु येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेवरील शिक्षक खुशाल उगले यांनी इयत्ता चौथीच्या वर्गातील चिमुरडी मुलींसोबत लैंगिक अत्याचार केल्याची घटना
२३ ऑगस्ट रोजी उघडकीस आली. त्यामुळे परिसरामध्ये व जिल्ह्यामध्ये एकच खळबळ उडाली. आरोपी शिक्षक खुशालराव उगले हे इयत्ता चौथीच्या वर्गाला वर्गशिक्षक होते. वर्दडी बु येथील पालक व 3 मुलींनी थेट पोलीस स्टेशन गाठून झालेल्या लैंगिक अत्याचार प्रकरणी पोलीस अधिकाऱ्यांना माहिती दिली. आरोपी शिक्षकाविरुद्ध विविध कलमाने पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वर्दडी बु येथील जिल्हा परिषद शाळा असून या ठिकाणी इयत्ता १ ते ८ वर्ग आहेत. मागील एक ते दीड वर्षापासून आरोपी शिक्षकांची नियुक्ती होवून कार्यरत होते. त्यांच्याकडे मागील वर्षी त्यांच्याकडे इयत्ता ३ चा
वर्ग होता. यावर्षी वर्ग ४ था होता. इयत्ता ४ थीला खुशाल उगले नावाचे शिक्षक आहेत, सदर शिक्षक हे स्वतः वर्ग शिक्षक असलेल्या विद्यार्थिनी सोबत गैरवर्तन करत असल्याचे पालकांना सांगितले.