प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कारासाठी अर्ज सादर करावेत
जालना/प्रतिनिधी,दि.7
केंद्र शासनाच्या महिला व बालविकास विभागामार्फत बाल शक्ती पुरस्कार पुरस्कार देण्यात येतो. प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार वय ५ पेक्षा अधिक व १८ वर्षापर्यंतच्या ज्या मुलांनी शिक्षण, कला, सांस्कृतिक कार्य, खेळ नाविन्यपूर्ण शोध, सामाजिक कार्य व शौर्य अशा क्षेत्रात विशेष नैपुण्यपूर्ण कामगिरी केलेली आहे, त्यांना हा पुरस्कार दिला जातो. प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार २०२५ करिता केंद्र शासनाने अर्ज मागविले आहेत. तरी जिल्ह्यातील अशा प्रकारच्या जास्तीत जास्त मुलांचे प्रस्ताव सादर करावेत, असे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, जालना यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.
प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्काराचे अर्ज (https://awards.gov.in) या संकेतस्थळामार्फत ऑनलाईन पध्दतीने स्वीकारले जाणार आहेत. ज्या मुलांचे वय ५ पेक्षा अधिक व ३१ जुलै, २०२४ रोजी १८ वर्षांपेक्षा कमी आहे व ज्या मुलांनी शिक्षण, कला, सांस्कृतिक कार्य, खेळ नाविन्यपूर्ण शोध, सामाजिक कार्य व शौर्य अशा क्षेत्रात विशेष नैपुण्यपूर्ण कामगिरी केलेली आहे. त्यांचे प्रस्ताव संकेतस्थळावर स्वतः मुले किंवा त्यांचे वतीने राज्य सरकार, केंद्रशासित प्रदेश, जिल्हाधिकारी/जिल्हादंडाधिकारी, पंचायत राज्य संस्था, नागरी स्वराज्य संस्था, शैक्षणिक संस्था आदि अर्ज करु शकतात. असेही प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविण्यात आले आहे.