देव प्रकाश बमणावत यांची निवडणूक निरीक्षक (खर्च) म्हणून नियुक्ती
जालना/प्रतिनिधी, दि.23
विधानसभा सार्वत्रिक निवडणूक- 2024 च्या अनुषंगाने भारत निवडणूक आयोगाने 99 – परतूर, 100 – घनसावंगी, 101 – जालना, 102 – बदनापूर आणि 103 – भोकरदन विधानसभा मतदार संघाकरीता देव प्रकाश बमणावत (आय.आर.एस.) यांची निवडणुक निरीक्षक (खर्च) म्हणुन नियुक्ती केली आहे.
निवडणूक निरिक्षक (खर्च) देव प्रकाश बमणावत यांचा मुक्काम जालना येथील शासकीय विश्रामगृहातील गोदावरी कक्षात राहणार आहे. त्यांना भेटण्याची वेळ सकाळी 11 ते दुपारी 12 वाजेपर्यंत असून त्यांचा संपर्क क्रमांक 9209459002 असा आहे. त्यांचे संपर्क अधिकारी म्हणुन जिल्हा परिषदेचे मुख्य लेखा व वित्त अधिकारी श्री. राजू सोळूंके यांची नियुक्ती करण्यात आल्याचे असे जिल्हा निवडणूक यंत्रणेने कळविले आहे.