दरोडयाच्या पुर्व तयारीत असणाऱ्या आरोपीतांच्या मौजपुरी पोलीसांनी मुसक्या आवळल्या

विरेगाव/गणेश शिंदे, दि.22
मौजपुरी पोलीस ठाण्याचे सपोनि श्री. मिथुन घुगे यांच्या सुचने प्रमाणे पोउपनि नेटके, प्रदिप पाचरणे, अविनाश मांटे,धोंडीराम वाघमारे हे दि. 20 रोजी पोलीस ठाणे मोजपुरी हद्दीत पेट्रोलिंग करत असतांना गोपनीय बातमीदार मार्फत बातमी मिळाली कि, काही इसम दरोडा टाकण्याच्या तयारीत मौजे सावरगाव शिवारात मोटार सायकवर फिरत आहे. मिळालेल्या माहितीवरुन ‘मौजपुरी पोलीसांनी सावरगाव येथील ग्रामस्थांच्या मदतीने सदर आरोपीतांचा सावरगाव शिवारात शोध घेतला असता पोलीसांना व ग्रामस्थांना पाहून पाच ही आरोपी मोटार सायकलवर बसुन हडप च्या दिशेने पळुन जात होते त्यावेळी मौजपुरी पोलीसांनी सावरगाव च्या ग्रामस्थांच्या मतदतीने त्यांचा पाठलाग केला असता त्यातील दोन आरोपी हे त्यांच्या जवळील मोटार सायकल व दरोडयाच्या साहीत्या साधनासह ‘मिळुन आहे. व तीन आरोपी पळुन गेले पकडलेल्या दोन आरोपीतांचे नाव विशाल कालबल्या चव्हाण व गणेश नितीन चव्हाण दोन्ही रा. वाशिम असे असुन यातील आरोपी नामे विशाल कालवल्या चव्हाण हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असुन त्याचे विरुध्द जिल्हा वाशिम येथील विविध पोलीस ठाणेला चोरी, चोरीचा प्रयत्न, घरफोडी व खुनासह दरोडा अशा स्वरुपाचे एकुण (१२) गंभीर गुन्हे दाखल असुन सदर आरोपीस पकडल्यामुळे जिल्हा तसेच जिल्हा बाहेरील गंभीर गुन्हे उघड येण्याची शक्यता आहे. आरोपी नामे विशाल कालबल्या चव्हाण व गणेश नितीन चव्हाण दोन्ही रा. वाशिम व पळुन गेलेल्या तीन आरोपीतांन विरुध्द पोलीस ठाणे मौजपुरी येथे गुन्हा रजि.नं. २९८ / २०२३ कलम ३९९,४०२ भादंवि प्रमाणे गुन्हा दाखल केला असुन दोन्ही आरोपीतांना आजरोजी मा. न्यायालयात हजर केले असता मा. न्यायालाने दोन्ही आरोपीतांना ‘न्यायालयीन कोठडी सुणावली असुन सदर गुन्हयाचा तपास पोउपनि राकेश नेटके हे करीत आहेत.
‘सदरची कारवाई ही श्री. शैलेश बलकवडे, साहेब, पोलीस अधीक्षक, जालना, श्री.सुरेश बुधवंत साहेब, उपविभागीय पोलीस अधिकारी, उप विभाग परतुर यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि श्री. मिथुन घुगे, पोउपनि श्री. राकेश नेटके, पोलीस अंमलदार अविनाश मांटे, प्रदिप पाचरणे, धोंडीराम वाघमारे, सदाशिव खरे यांनी . केली आहे.