संत बाळूमामा जन्मोत्सव सोहळा पिठ्ठी येथे उत्साहात होणार साजरा
15 ऑक्टोंबर रोजी भाविक भक्तांनी मोठ्या संख्येने सोहळ्यात सहभागी व्हावे

पाटोदा/नितिन भोंडवे,दि.14
श्री संत सद्गुरू बाळुमामा यांचा जन्मोत्सव बीड जिल्ह्यातील पाटोदा तालुक्यातील पिठ्ठी येथे भव्य उत्साहात साजरा होणार आहे. दरवर्षीप्रमाणे यावर्षीही 15 ऑक्टोंबर वार मंगळवार रोजी भव्य जयंती उत्सव पिठ्ठी नगरीत साजरा होणार असून भव्य कीर्तन महोत्सव चे आयोजन केले गेले आहे.
जगाचा मालक श्री संत सद्गुरू बाळुमामा यांचा महिमा पूर्ण देशात आपणास पहावयास मिळत आहे. त्यांच्या अनेक पालख्या विविध भागात फिरत असतात त्यांची मेंढरं सांभाळण्यासाठी दूर दूर वरून अनेक भाविक भक्त येत असतात.सेवा करतात. जगाच्या मालकाचा उघडा पसारा जेथे जाईल तिथे मामाचा दरबार भरतोच.
यावर्षी पिठ्ठी वासियांचे भाग्य असे की, जन्मोत्सवाच्या तोंडावर संत सद्गुरु बाळूमामा देवालय आदमापूर पालखी क्रं – 9 चे आगमन नगरीमध्ये झाले आहे.भव्य कीर्तन महोत्सवाची सुरुवात 09 ऑक्टोंबर ला सुरू झाली असून येत्या 15 ऑक्टोंबर ला मामाचा जन्मोत्सव साजरा होणार आहे. त्यामुळे पंचक्रोशीतील समस्त ग्रामस्थ भाविक भक्तांनी मामाच्या दरबारी येऊन जयंती उत्सवाच्या आनंदाच्या सोहळ्यात सहभागी व्हावे…