मुसळधार पाऊस आणिवादळी वाऱ्यामुळे शेतकऱ्याच्या सौर पॅनलचे नुकसान

हदगाव/प्रतिनिधी,दि.18
तालुक्यातील मौजे कोळी शिवारात गेल्या दोन ते तीन दिवसापासून अचानक आलेल्या वादळी वारा व मुसळधार पाऊसामुळे शिवारातील तील शेतकर्याच्या गोठ्याचे मोठे नुकसान झाले असून, या मुसळधार पाऊस व वादळी वाऱ्यामुळे शेतात लावलेल्या सौर उर्जा पॅनललाही मोठा तडाखा बसला आहे. हदगाव तालुक्यात 15 जुलै रोजी सायंकाळी अचानक आलेला वादळी वारा आणि मुसळधार पाऊसामुळे मौजे कोळी ता. हदगाव येथील शेतकरी माणिक शिवाजी चौतमाल यांच्या गट क्रमांक 498 या शेतात लावलेल्या सौर उर्जा पॅनलचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले तर जवळच असलेल्या गोठ्यावरची पत्रे उडून गेले सुदैवाने यात कुठलीही जीवित हानी झाली नाही . पिडीत शेतकरी माणिक शिवाजी चौतमाल यांनी मुख्यमंत्री सौर पंप योजनेअंतर्गत 2021 या वर्षी आपल्या शेतात जे. के. कंपनीचा सौर पंप व सौलर पॅनल बसविले होते. मात्र, वादळी वारा व मुसळधार पावसामुळे या सौर पॅनलचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, हे पॅनल वादळी वाऱ्याच्या तडाख्यात सापडून ठिकठिकाणी फुटले आहे. तालुक्यात अचानक आलेल्या या अस्मानी संकटामुळे शेतकर्यापुढे नवे आव्हान उभे टाकले आहे.