pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

भास्कर अंबेकर यांना जालना विधानसभे ची उमेदवारी देण्याची शिवसेना पदाधिकाऱ्यांची उद्धव ठाकरे यांच्याकडे मागणी.

0 3 1 2 7 3

जालना/जितेंद्र गाडेकर,दि.7

दिनांक 08/10/2024
जालना विधानसभा मतदार संघातील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे तालुका प्रमुख हरिहर शिंदे यांच्या नेतृत्वात पदाधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळाने पक्षप्रमुख मा.श्री.उद्धवजी ठाकरे यांची मुंबई येथील त्यांच्या मातोश्री निवासस्थानी भेट घेतली. जालना विधानसभेत आजपर्यंत चार वेळा शिवसेना पक्षाचा आमदार निवडून आलेला आहे. जालना नगर परिषदेतही गेली अनेक वर्षे शिवसेनेचाच झेंडा होता. त्यामुळे या मतदार संघात पक्षाला मानणारा मोठा मतदार आहे. जालना मतदार संघ महाविकास आघाडीच्या जागा वाटपात लोकसभेला काँग्रेसला सुटल्याने जालना विधानसभेची जागा शिवसेनेला सोडवून घेऊन शिवसेना जिल्हाप्रमुख भास्कर अंबेकर यांना उमेदवारी द्यावी, अशी जोरदार मागणी शिष्टमंडळाच्या वतीने करण्यात आली.
भास्कर अंबेकर हे गेली 38 वर्षे शिवसेनेचे निष्ठावंत शिवसैनिक म्हणून कार्यरत आहेत. पक्षाच्या फुटी नंतरही ते शिवसेनेतच राहिले. अनेकविध पक्षांनी त्यांना आपल्या पक्षाकडून उमेदवारी देऊ केली असतानाही पक्षनिष्ठा न सोडता त्यांनी शिवसेनेतच काम केले.
शिवसेनेचे शहर प्रमुख, उपजिल्हाप्रमुख व गेल्या पंधरा वर्षांपासून जिल्हाप्रमुख म्हणून त्यांनी संघटना मजबूत केली. जालना नगरपरिषदेमध्ये अनेकवेळा नगरसेवक, दोन वेळा नगराध्यक्ष म्हणून काम केले. आपल्या नगराध्यक्ष पदाच्या कारकिर्दीत त्यांनी अनेक विकास कामे केल्याने शहरवासीयांना त्यांची कारकीर्द कायम संस्मरणीय आहे. त्यांचा दांडगा जनसंपर्क व सर्वांना सोबत घेऊन चालण्याच्या दृष्टीमुळे ते लोकप्रिय आहेत. जालना बाजार समितीतही ते सोळा वर्षे संचालक व उपसभापती म्हणूनही त्यांनी काम केले .खरंतर त्यांना खूप वर्षांपूर्वीच विधानसभेची संधी मिळायला पाहिजे होती. आता तरी जालना विधानसभा मतदार संघ शिवसेनेकडे घेऊन शिवसेना जिल्हाप्रमुख भास्कर अंबेकर यांना उमेदवारी द्यावी. अशी जोरदार मागणी उद्धवजी यांच्याकडे शिष्टमंडळांने केली.
या शिष्टमंडळात तालुकाप्रमुख हरिहर शिंदे यांच्यासह माजी जिल्हा परिषद सदस्य बबनराव खरात, माजी पं. स. सभापती मुरलीआबा थेटे, माजी जि.प. सभापती देवनाथ जाधव, विधानसभा संघटक दीपक रणनवरे, शहरप्रमुख बाला परदेशी, घनश्याम खाकीवाले, दुर्गेश काठोटीवाले, उपतालुका प्रमुख प्रभाकर उगले, हरिभाऊ शेळके, प्रभाकर घडलिंग, अंकुशराव राजेजाधव, माजी जि.प.सदस्य अशोक खलसे, युवा सेनेचे संदीप मगर, परमेश्वर डोंगरे, संतोष खरात, बळीराम ढवळे, सुरेश वाघमारे यांच्यासह आदींची उपस्थिती होती.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 3 1 2 7 3

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे
बातमी देण्यासाठी येथे क्लिक करा
02:15