अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्तीसाठी ऑनलाईन अर्ज करावेत
जालना/प्रतिनिधी,दि. 29
जिल्ह्यात समाज कल्याण कार्यालयामार्फत भारत सरकार मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती योजना राबविण्यात येते. शैक्षणिक वर्ष 2024-25 मधील प्रवेशित व भारत सरकार शिष्यवृत्ती, शिक्षण शुल्क प्रतिपुर्ती व इतर ऑनलाईन योजनेसाठी पात्र असलेल्या अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी महाडिबीटी प्रणाली दि. 25 जुलै 2024 पासून सुरु करण्यात आली आहे. तरी जालना जिल्ह्यातील सर्व कनिष्ठ, वरिष्ठ, व्यावसायिक महाविद्यालयातील प्राचार्यांनी शिष्यवृत्ती योजनांची माहिती दर्शविणारा व अर्ज करण्याच्या अंतिम तारखेची नोंद असलेला फलक महाविद्यालयाच्या दर्शनी भागावर लावावा. तसेच आपल्या महाविद्यालयातील प्रवेशित सर्व मागासवर्गीय विद्यार्थ्याचे अर्ज दि. 30 मार्च 2025 पर्यंत ऑनलाईन पध्दतीने भरुन घेण्याची कार्यवाही करावी, असे आवाहन जालना समाज कल्याणचे सहायक आयुक्त प्रदीप भोगले यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.