“आम्ही सारे बच्चू कडू” जयघोषाने दुमदुमले नांदेड शहर, जागतिक दिव्यांग दिनी धडकला जिल्हाधिकारी कार्यालयावर आक्रोश मोर्चा…
सकल दिव्यांग समाजाचा मोर्चामध्ये शेकडोंचा सहभाग. माजी आमदार बच्चू कडू यांच्या पुनर्वसनासाठी दिव्यांग, वृद्ध निराधारांचा ३ डिसेंबर रोजी जागतिक दिव्यांग दिनीच जिल्हाधिकारी कार्यालयावर आक्रोश मोर्चा

नांदेड/प्रतिनिधी, दि.4
नांदेड: प्रहार संघटनेचे संस्थापक तथा माजी आमदार बच्चू कडू यांच्या समर्थनात नांदेड येथील दिव्यांग वृद्ध निराधारांचा आक्रोश मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. यावेळी माजी आमदार बच्चू कडू यांचे पुनर्वसन करून मंत्रिमंडळात समावेश करण्यात यावे ही मागणी लावून धरण्यात आली. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत अचलपूर मतदारसंघातून बच्चू कडू यांचा पराभव झाला. हा पराभव ईव्हीएम मशीनमुळेच झाल्याचा आरोप करत हा पराभव आम्हाला मान्य नाही म्हणत आमच्या जिव्हारी लागला असल्याचे म्हणत दिव्यांग, वृद्ध निराधारांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढला. माजी आमदार बच्चू कडू यांचे पुनर्वसन करावे या प्रमुख मागणी सह माझा लाडका दिव्यांग या माध्यमातून संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील दिव्यांग, निराधारांचे मानधन 1500 रूपये वाढवून प्रतिमाह 5000 रुपये करण्यात यावे, दिव्यांग कायदा 2016 ची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी, महायुती सरकारने लाडकी बहीण योजनेप्रमाणेच लाडका दिव्यांग योजना राबवावी,
स्थानिक स्वराज्य संस्था आणि नागरी स्वराज्य संस्थांकढील दिव्यांगांचा राखीव 5 टक्के निधी हा तुटपुंज्या स्वरूपात असल्यामुळे डिबीडी जिल्हा नियोजन समीतीकडे येणाऱ्या विविध विकास निधीमध्ये दिव्यांगांसाठी 5 टक्के राखीव निधीची तरतूद करण्यात यावी, आमदार स्थानिक क्षेत्र विकास कार्यक्रम अंतर्गतचा दिव्यांगांच्या कल्याणासाठीचा दरवर्षीचा 30 लक्ष रूपये दरवर्षी न चुकता खर्च करण्यात यावे. खासदार यांच्या एम्पीलैड्समधील दिव्यांगांचा दरवर्षीचा 30 लक्ष रूपये दरवर्षी दिव्यांगांवर काटेकोरपणे खर्च करण्यात यावे.
दिव्यांगांना अंत्योदय राशन कार्ड देण्यात यावे, घरकुल, रोजगार यासह अनेक मागण्या करण्यात आल्या होत्या.हा आक्रोश मोर्चा डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून जिल्हा परिषद, महापालिका ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत काढण्यात आला होता.
जिल्हाधिकारी कार्यालय समोर ईव्हीएम मशीन व मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या प्रतिमेची विधिवत पूजा अर्चना करून मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांना सुदबुद्धी लाभो आणि आम्हा दिव्यांगांच्या मागण्या मान्य होवो यासह ईव्हीएम मशीन संदर्भातील शंकेचे निराकरण होवो अशी प्रार्थना करण्यात आली.
‘आमचा कायदा नाही, तर तुमचा फायदा नाही’ म्हणत ‘चले जाव’ चे आंदोलन केले,या मोर्चातील दिव्यांगांना पत्रकार संरक्षण समीतीच्या वतीने पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती तर धम्माभाऊ कांबळे मित्र मंडळ खोब्रागडेनगर नांदेड यांच्याकडून अन्नदानाची व्यवस्था करण्यात आली होती. जवळपास सकाळपासून संध्याकाळपर्यंत चाललेल्या या सनदशीर आंदोलनाला जिल्हा परिषद, महानगरपालिका या दोन्ही कार्यालयातील अधिका-यांनी भेट न दिल्यामुळे संतप्त दिव्यांग हे थेट जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकले. एकंदरीतच दिव्यांगांचे उग्र रूप पाहता पोलिस प्रशासनाने सर्वच प्रवेशद्वार बंद करून ठेवले होते. परीणामी दिव्यांगांना जिल्हाधिकारी कार्यालयासमोरच ठाण मांडून बसत अखेर रस्ता रोको आंदोलन करावे लागले. या रास्तारोको आंदोलनात दोन ॲम्ब्युलन्स वाहन आणि एक गंभीर गुन्ह्यातील आरोपी घेऊन जाणारी पोलिस जिप्सी वगळता इतर कुठलेच वाहन दिव्यांगांनी जाऊ दिले नाही, पोलिस प्रशासनाने मध्यस्थी करून निवासी उपजिल्हाधिकारी यांच्याशी शिष्टमंडळासह भेट घडवून आणण्याचा प्रयत्न केला होता परंतु दिव्यांगांनी आज जागतिक दिव्यांग दिवस असतांना तसेच जिल्हाधिकारी हे कार्यालयात उपस्थित असताना सुद्धा आम्हाला भेटु शकत नाहीत आमच्या समस्या जाणून घेऊ शकत नसतील तर त्यांचा आमच्यासाठी काय फायदा कारण लोकसभा पोटनिवडणुक आणि विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या काळात आमच्या घरोघरी येऊन आमचे भरघोस मतदान करून घेतले मग आता आमचा विटाळ झाला का म्हणत आमचे मत परत करा..परत करा असे नारे देत आक्रमक भूमिका घेत दिव्यांगांनी उग्र रूप धारण केले. दिव्यांगांचे उग्र रूप पाहता जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातून पळ काढला त्यानंतर तर दिव्यांगांचा रोश अजुनच वाढला सकाळी दहा पासुन ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत जिल्ह्याचे जिल्हादंडाधिकारी देखील आपल्याला आजच्या जागतिक दिनी भेट देऊ शकत नसल्याचा राग मनात धरून संतप्त शेकडो दिव्यांगांनी आक्रोश मोर्चाच्या रूपात व देशपर गितांच्या माध्यमातून थेट वजीराबाद पोलीस स्टेशन गाठले, आणि तेथे जाऊन जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद, महापालिका आयुक्त, जिल्हा पुरवठा अधिकारी, जिल्हा नियोजन अधिकारी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी पंचायत विभाग, महिला व बाल विकास अधिकारी, समाज कल्याण अधिकारी, सर्वच तहसीलदार यासह संबंधित सर्वच शासकीय अधिकारी कर्मचारी ज्यांच्याकडे दिव्यांगांच्या शासन निर्णयांची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी आहे अशा सर्वच बेजाबदारांवर आरपीडब्ल्यु डी कायदा 2016 व दफ्तर दिरंगाई कायद्यासह सेवा हमी कायद्या अंतर्गत तत्काळ गुन्हे दाखल करून त्या सर्वांना अटक करा म्हणत शेकडो दिव्यांगांच्या स्वाक्षरीने तक्रार दाखल केली. वजीराबाद पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक परमेश्वर कदम यांनी शेकडो आंदोलक दिव्यांग यांना पोलीस स्टेशन येथेच गुलाबाचे फुल देऊन सर्वांना जागतिक दिव्यांग दिनाच्या शुभेच्छा दिल्या व त्यांची तक्रार स्विकारत सकाळपासूनच आक्रमक रूप घेतलेल्या दिव्यांगांना मायेचा आधार देत त्यांची समजूत घातली रात्री जवळपास साडेसात वाजेपर्यंत चाललेल्या या बोलचालीत जिल्हाधिकारी कार्यालयातून जिल्हाधिकारी आपणास भेटण्यास तयार आहेत या म्हणत मकरंद दिवाकर, निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर यांनी खुप प्रयत्न केले परंतु त्यांच्या प्रयत्नांना यश आलेच नाही, शेवटी वजीराबाद पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक परमेश्वर कदम यांनी संबंधित शासकीय अधिकारी कर्मचारी यांच्यावर गुन्हे दाखल करण्याची तक्रार घेतल्यानंतरच संतप्त शेकडो दिव्यांगांचे समाधान झाले आणि त्यांनी तिथेच आपले आंदोलन थांबविले, जागतिक दिव्यांग दिनी निघालेल्या या मोर्चाचे नेतृत्व दिव्यांग संघर्ष समिती महाराष्ट्र राज्याचे राहुल साळवे, दिव्यांग वृद्ध निराधार मित्र मंडळ महाराष्ट्र राज्याचे चंपतराव पाटील डाकोरे, आदित्य पाटील,देविदास बद्देवाड, फेरोज खान,रवी कोकरे,भोजराज शिंदे, नारायण नवले, मगदुम शेख,सुनील जाधव,शेख अजिज,शेषेराव वाघमारे, राजू इराबत्तीन, सुधाकर पिलगुंडे, राजू शेरकुलवार, चंदाराव चव्हाण, रुस्तुम काळे, नागनाथ कामजळगे, उमेश भगत, दतात्रय सोनकांबळे,प्रदीप हनमंते, कार्तिक भरतीपूरम, शिवाजी सूर्यवंशी, पिंटु राजेगोरे,अजय गोरे,शेख आरीफ,यासह मुदखेड,हदगाव,लोहा, बिलोली, किनवट, भोकरसह समस्त जिल्हाभरातील दिव्यांग व मुकबधीर कर्णबधिर संघटना, ब्लाइंड संघटना यासह सकल दिव्यांग समाज शेकडोंच्या संख्येत सहभागी झाला होता.