pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

उरण मेडिकल वेल्फेअर असोसिएशन कडून उरणच्या महिलांना महिला दिनाची एक अनोखी भेट.

0 3 1 2 0 6

उरण/विठ्ठल ममताबादे,दि.12

महिला सक्षमीकरण आणि मानवता सक्षमीकरण हे ब्रीदवाक्य असलेली हि वैद्यकीय सेवा आरोग्य सेवा म्हणजेच आजारांचे निदान, उपचार आणि त्यावर प्रतिबंध करण्यासाठी देण्यात येणाऱ्या सेवेला वैद्यकीय सेवा म्हणतात आणि या अशा वैद्यकीय सेवेमुळे एखाद्या व्यक्तीचे आरोग्य तर उत्तम होतेच पण त्या व्यक्तीला जीवनदान मिळते. डॉक्टर रुग्ण यांच्यातील हे नाते विश्वास, आदर, संवाद यावर आधारलेले असते.अशा या वैद्यकीय सेवेचे इंडियन कॅन्सर ट्रीटमेंट सेंटर (आय.सी.टी.सी.) यांच्या संयुक्त विद्यमाने उरण मेडिकल वेल्फेअर असोसिएशन कडून ब्रेस्ट कॅन्सर विषयी जनजागृती आणि मोफत थर्मल मेमोग्राफी शिबिराचे आयोजन हॉटेल भोईर गार्डन कोट नाका उरण येथे जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून आयोजित करण्यात आले होते.डॉ. घनश्याम पाटील (अध्यक्ष उरण मेडिकल वेल्फेअर असोसिएशन) डॉ. सलील पाटकर (आय.सी.टी.सी वाशी आणि पनवेल), डॉ. सत्या ठाकरे (सेक्रेटरी उरण मेडिकल वेल्फेअर असोसिएशन),डॉ. सचिन गावंड (खजिनदार उरण मेडिकल वेल्फेअर असोसिएशन) यांच्या मार्गदर्शनाखाली हे शिबिर घेण्यात आले. त्याचप्रमाणे उरण मधील महिलांच्या विविध सामाजिक संस्था वुमेन ऑफ विस्डम सामाजिक व शैक्षणिक संस्था उरण, कुटुंबिनी महिला संघ उरण, कलश इंटरटेनमेंट, माई फाउंडेशन, पत्रकार उत्कर्ष समिती , स्वर्गीय तृप्ती सुधीर सुर्वे फाउंडेशन, महालन सामाजिक संस्था उरण, आधार फाउंडेशन या संस्थांचा यामध्ये सहभाग होता.या मधे सर्व सामाजिक कार्यकर्त्या च्या प्रमुख सीमा घरत, श्लोक पाटील, कल्पना सुर्वे, सारिका पाटील, आरती ढोले, नम्रता पाटील, तृप्ती भोईर, रंजना म्हात्रे या सर्व महिलांनी सहभागी होऊन खूप मेहनत घेवून हा कॅम्प यशस्वी केला.या कॅन्सर स्क्रीनिंग कॅम्प मधे २ दिवसात १४२ महिलांचे स्क्रीनिंग झाले

डॉ. संगीता डाके (एमडी गायनोलॉजिस्ट), डॉ. मोना बोरकर (एमडी) (गायनोलॉजिस्ट), डॉ कृष्णा बोरकर ( ग्यानॅकॉलोगीस्ट ), डॉ. रंजना म्हात्रे (कल्चरल सेक्रेटरी), डॉ. शुभांगी मोकल (कल्चरल सेक्रेटरी),डॉ. सुलोचना पाटील, डॉ. राणू ठाकरे, डॉ.प्राजक्ता कोळी, डॉ. दया परदेशी , डॉ सविता ढेरे , डॉ वनिता पाटील या महिला डॉक्टरांनी या शिबिरासाठी महत्वाचे योगदान दिले.

उरण मेडिकल वेलफेअर असोसिएशन चे पेट्रोन डॉ. सुरेश पाटील व डॉ. मंगेश डाके ,डॉ. संजीव म्हात्रे हे मार्गदर्शन करण्यासाठी शिबिरात पुर्ण वेळ उपस्थित होते.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 3 1 2 0 6

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे
बातमी देण्यासाठी येथे क्लिक करा
07:33