सुरंगली येथे गणेश विसर्जन उत्साहात आणि शांततेत ; ढोल ताशांच्या गजरात गणरायाला निरोप

भोकरदन/ संजीव पाटील,दि.19
भोकरदन तालुक्यातील सुरंगली येथे गणेश विसर्जन मिरवणूक उत्साहात आणि जल्लोषात शांततेत पार पडली. ढोलताशांच्या गजरात गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या . या घोषणेने गणरायाला गणेश भक्तांनी निरोप दिला. काशी विश्वेश्वर गणेश मंडळाचे आणि राघवानंद गणेश मंडळाचे पदाधिकारी,सदस्य गणेश विसर्जन मिरवणूकीत सामील झाले होते.काशीविश्वेश्वर गणेश मंडळाचे पदाधिकारी भाऊसाहेब काळे, तुकाराम जाधव पहेलवान ,विजय काळे, संजीव पाटील माजी सरपंच, पोलिस पाटील संजय तुकाराम दांडगे,संजय शेनफड दांडगे, राघवानंद गणेश मंडळाचे पदाधिकारी,सदस्य समाधान मनोहर जाधव, सतीश एकनाथ जाधव, विशाल प्रकाश पाटील,अनिल साहेबराव जाधव,सतीश सुरेश जाधव,, कृष्णा जाधव,सतीश दादाराव जाधव , तेजराव रामभाऊ जाधव,सुभाष वर्पे,अनिल जाधव, शंकर जाधव ,किरण अप्पा खोंडे यांच्या सह अनेक गणेश भक्त गावकरी मिरवणूकीत सामील झाले होते. जुई धरण पाण्यात गणेश मुर्ती विसर्जन करण्यात आल्या. गणेशोत्सवात राघवानंद गणेश मंडळ, काशी विश्वेश्वर गणेश मंडळ,साळुबानाईक वाडी वरील गणेश मंडळाने भंडारा, काशी विश्वेश्वर गणेश मंडळाने सत्यनारायण पूजा, राघवानंद गणेश मंडळाने अन्नदान भंडारा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. विसर्जन मिरवणूकीत पोलिस पाटील संजय तुकाराम दांडगे यांची विशेष उपस्थिती होती.