दिव्यांग,वृध्द, निराधार,शेतमजुर,गायरानपट्टेधारक, शेतकरी यांना मदत न करणाऱ्या ना मतदानातून रस्ता दाखवा- चंपतराव डाकोरे पाटिल

नांदेड/प्रतिनिधी,दि.9
प्रिय जागृत दिव्यांग,वृध्द,निराधार,शेतमजुर,गायरानपट्टेधारक, शेतकरी मतदार बांधवांनो आपण देशाचे मतदार मालक असुन आपल्या समस्या अडचणी गोरगरीब मतदारांचे प्रश्न अधिवेशनात मांडून उपेक्षित गरीबांना न्याय हक्क मिळावा म्हणून दर पाच वर्षांनी आपण मतदान रूपाने आपला प्रतिनिधी निवड करतो.
मतदार मालकाचे सेवक कोट्याधीश संपती असणाऱ्यांआमदाराला दरमहा लाखो रू मानधन अनेक सवलती असून ते जीवन जगण्यासाठी अनेक ऊधोगधंदे करावे लागतात? मतदार मालक दिनदुबळे दिव्यांग वृध्द निराधार मतदारांना दरमहा दिड हजारात कसे जिवन जगत असतील यांचा विचार न करणाऱ्या ऊमेदवाराना मतदान रुपाने घरचा रस्ता दाखऊन लोकशाही दाखवा
निवडणुकीच्या वेळि आम्ही दिनदूबळ्याचे कैवारी म्हणुन मते मांगतात पण ते पाच वर्ष आपल्या पिढ्यानपिढ्या ची व्यवस्था करण्यात गुंग होतात आपलेच मानधन वाढ अनेक सवलतीचा करून घेतात.
मतदार बांधवांनो आपण ज्या उमेदवाराला मतदान देताना विचारपुर्वक मतदान करणे अंत्यंत गरजेचे आहे.अगोदर ज्या उमेदवाराची निवड केली त्यांनी आपणास दिलेले आश्वासन पाळले का ? ते दिंनदुबळ्याचे कैवारी म्हणुन मते घेऊन अधिवेशनात किती वेळा प्रश्न मांडले ते विचारणे गरजेचे आहे.
दिव्यांग,वृध्द, निराधार मतदार मालकांना मिळणारे अनुदान त्यांचे निकष व मतदान रूपाने निवड केलेल्या आमदाराला कोट्याधीश संपती असणाऱ्याना मिळणारे अनुदान त्यांना निकष का नाहित ते खालिल प्रमाणे*
१}
दिव्यांग,वृध्द, निराधार बांधवांना जगण्यासाठी आधार म्हणुन दरमहा एक हजार पाचशे रुपये दरमहा वेतन दिले जाते. तेहि दोन ते चार महिने मिळत नाही.
त्यांचे निकष दिव्यांगाचे ४० टक्के प्रमाणपत्र असावे ,२} १८ वर्षांचा मुलगा नसावा,३]त्यांच्या पुर्ण कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न पन्नास हजार असावे, त्यांच्या कुटुंबात शेती नसावी.
निराधारांना दरमहा दिड हजार मानधन मिळण्यासाठी निकष खालिल प्रमाणे
१) त्यांचे द्रारेद्रे रेषेत नाव असावै,२) मुलगा अठरा वर्षाचा कर्ता नसावा ३} त्यांच्या पुर्ण कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न एकविस हजार असावे .
जे शेतमजुरी करून देशाची तिजोरी भरतात त्या वयोवृध्दाना दरमहा दरमहा दिड हजार मानधन मिळण्यासाठी निकष खालिल प्रमाणे
१).त्यांचे वय ६५ वर्षअसावै २} त्यांचे द्रारेद्रे रेषेत नाव असावै,२) मुलगा अठरा वर्षाचा कर्ता नसावा ३} त्यांच्या पुर्ण कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न एकविस हजार असावे
अशा मतदार बांधवांना दिड हजार मानधन दरमहा दिले जाते म्हणजे दररोज पन्नास रूपय तेहि दोन ते चार महिने मिळत नाही.
आता पहा गरिबांचे कैवारी म्हणून निवडण्यात आलेले कोट्याधीश संपती असणाऱ्या आमदार साहेबांना मिळणारे दरमहा मानधन लाखो रूपये अनेक सवलती दिल्या जातात ते आमदार करोडोंची संपती असताना त्यांना कोणतेहि निकष लागत नाहित त्यांना वेळेवर मानधन दिले जाते तरी आमदार साहेबांना ते मानधनात वाढ केली जाते,अनेक संस्था, कारखाने,ऊध्योग,अनेक मार्गाने ऊत्पन असुन ते सुखी जीवन जगुन शकत नसतील तर जे दिनदुबळे दिव्यांग वृध्द निराधारा दिड हजार मानधनात कसे जगत असतील तेहि तीन ते चार महिने मिळत नाही .
तमाम सुज्ञ मतदार बांधवांनो जागे व्हा आपण देवाच्या मतदार मालकाच्या प्रश्नाकडे लक्ष न देणाऱ्या उमेदवारांना मतदानातुन सेवेतुन मुक्त करावे योग्य सेवकांची निवड करावे असे आव्हान दिव्यांग वृध्द निराधार मित्र मंडळ महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटिल यांनी केले