नेहरू विद्यालय माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय गोलापांगरी येथे डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन जयंती शिक्षक दिन म्हणून साजरी
विद्यालयात स्वयंशासन दिन उत्साहात साजरा

गोलापांगरी/प्रतिनिधी, दि.8
गोलापांगरी शिक्षण प्रसारक मंडळ अंतर्गत नेहरू विद्यालय माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय गोलापांगरी येथे डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन जयंती व शिक्षक दिनानिमित्त
स्वयंशासन दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी
नेहरू विद्यालयात कोणी बनले मुख्याध्यापक, कोणी बनले पर्यवेक्षक तर कोणी बनले शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी चालवली शाळा.
मंगळवारी पाच 5 सप्टेंबरला प्रार्थना व परिपाठानंतर मुले आपापल्या वर्गात बसली व नवीनच शिक्षक वर्गात दाखल झाले. आपल्याच मोठ्या भाऊ बहिणीच्या वयाचे हे शिक्षक पाहून विद्यार्थी आनंदून गेले.
इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांनी मुख्याध्यापक, पर्यवेक्षक, सेवक, शिक्षक बनत प्रत्येकानी आपापली जबाबदारी पार पाडली. निमित्त होते शिक्षक दिनाचे
विद्यालयात स्वयंशासन दिन साजरा करण्यात आला. यामध्ये दहावीच्या विद्यार्थ्यांमधून कुमारी मयुरी खेडेकर मुख्याध्यापिका तर पर्यवेक्षक म्हणून ऋषिकेश लोहकरे,सेवक म्हणून कांबळे, शिक्षक म्हणून श्रुती मोरे, ऋतुजा देव्हडे, रेवती नाब्दे, अभिषेक मोरे, स्वाती मगरे, उषा बचाटे, शिवकन्या भोईटे या व इतर अनेक विद्यार्थ्यांनी शिक्षकांची भूमिका बजावत शाळेतील पहिली ते आठवीतील विद्यार्थ्यांना शिकवले,
विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट अध्यापनाचे काम केल्याबद्दल व दिवसभर स्वयंशिस्त, शांतता बाळगल्या
बद्दल — शाळेच्या मुख्याध्यापिका आदरणीय श्रीमती अनिता कुलकर्णी मॅडम, शाळेचे पर्यवेक्षक श्रीयुत आत्माराम मोरे सर, श्री के.एस. धांडे सर यांनी व इतर सर्वच शिक्षक बंधू भगिनींनी व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विद्यार्थ्यांचे भरभरून कौतुक केले व शिक्षक म्हणून त्यांचा सत्कारही केला.
अनेक विद्यार्थ्यांनी डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जीवनावर विचार मांडले तसेच गुरुजन वर्ग सातत्याने अध्यापनाचे काम करीत असतात म्हणून विद्यार्थ्यांकडून शिक्षकांचाही सत्कार करण्यात आला.
शाळेचे पर्यवेक्षक श्री आत्माराम मोरे सर यांनी या शिक्षक दिन व डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन जयंती व स्वयंशासन दिनानिमित्त
आपला अभिप्राय व्यक्त करताना मुलांनी दिवसभर अध्यापनाचे काम करणं हे काही सोपं नाही,शिस्त, शांतता पाहून त्यांनी आनंद व्यक्त केला. अनेकांचे पाठही चेक केले.
शाळेच्या मुख्याध्यापिका आदरणीय श्रीमती अनिता कुलकर्णी मॅडम यांनी आपले अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना शिक्षक सहकारी बंधू-भगिनी कसे अखंडपणे, सातत्याने अध्यापनाचे काम करून चिखल मातीच्या गोळ्याला आकार देण्याचे काम माझे सहकारी बंधू-भगिनी करतात, सहकारी वृत्ती, सुख दुःखात सहभागी होणे,
एखादे शासकीय काम कितीही तातडीचे असले तरी अगदी सर्वच जण एकजुटीने एकत्र येऊन ते काम काही मिनिटात, काही तासात पूर्ण करतात. आपल्या भावना व्यक्त करताना आनंदून त्यांचं हृदय भरून आले.
श्री टी. एस. मोरे यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले,तर श्री पी.डी.पांचाळ सर यांनी संचालन व आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली.