pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

समर्थ पूनम विजय एलीगार ( लाड ) सी.ए. ची परीक्षा उत्तीर्ण

0 3 1 1 9 9

गेवराई/प्रतिनिधी,दि.31

द इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट ऑफ इंडिया मार्फत घेण्यात येणाऱ्या सनदी लेखापाल अर्थात सीए या परीक्षेचा निकाल नुकताच घोषित करण्यात आला असून यामध्ये गेवराई येथील येथे समर्थ विजय एलीगार ( लाड ) हा विद्यार्थी उत्तीर्ण झाला आहे. या परीक्षेत मिळालेल्या यशाबद्दल सर्वत्र त्याचे कौतुक होत आहे.समर्थ चे प्राथमिक शिक्षण हे चिंतेश्वर विद्या मंदिर गेवराई येथे झाले ,त्यानंतर पुढील शिक्षण सेंट झेवियर्स येथे झाले,मात्र त्याच्या शैक्षणिक जीवनास कलाटणी ही शारदा विद्या मंदिर येथे मिळाली, शारदा विद्या मंदिर चे मुख्याध्यापक श्री.जगदाळे सर, लुंगारे सर,बोर्डे सर,काकडे सर,लोमटे मॅडम, यांच्या मार्गदर्शनाखाली,समर्थ दहावीला बोर्डाच्या परीक्षेत 96.टक्के घेऊन उत्तीर्ण झाला. त्यानंतर च्या महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण करण्यासाठी पुणे येथील बी.एम.सि.सि. ( बृहन महाराष्ट्र काॅलेज ऑफ काॅमर्स) प्रवेश घेऊन अकरावी बारावीचे शिक्षण घेत तिथेही 90.टक्के गुण घेऊन उत्तीर्ण होऊन पुढे बी. काॅम.पुर्ण करत क्लासेस करुन सि.ए.फायनल ची परीक्षा नोव्हेंबर महिन्यात दिली व या परीक्षेमध्ये त्यांनी भरघोस असे यश मिळवले समर्थ च्या या शैक्षणिक यशामध्ये सर्वात मोलाचे महत्त्वाचे योगदान त्याची मावशी श्रीदेवी लाड हिचे देखील आहे. वेळोवेळी समर्थचा अभ्यास घेण्याचे काम त्याची मावशी श्रीदेवी यांनी केले आहे त्याच्यामुळे त्याच्या या यशामध्ये श्रीदेवी लाड यांचा सिंहाचा वाटा आहे. त्याच्या या मिळवलेल्या यशाबद्दल समर्थ
चे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अमरसिंह पंडित साहेब, युवा नेते शिवराज पवार, युवा नेते रणवीर पंडित, अभिजित जैस्वाल, संजय राठोड, जीवन दाभाडे,महेश दाभाडे,मधुकर घुंबारडे,किरण मदुरे सर,दत्ता झेंडेकर, साप्ताहिक गेवराई संघर्ष योद्धा चे संपादक अमोल कापसे
माऊली डेंगळे ,रणजित जैस्वाल, गोरे आबा, राम अप्पा हादगुले, उमेश हादगुले,महेश सोसे,आनंद नावडे, भिवराज मुळूक, किशोर राऊत,संदीप लगड, दादासाहेब खडके, मगन दायमा, घोटणकर भावजी,अक्षय कुलकर्णी,योगेश कापसे,नाटकर,किरण शेंद्रे, गणेश पंडित, गरकळ सर,आलगुडे सर,अंबादास झेंडेकर, नारायण कनपुरे, ऊमेश राजुरकर, चकोर मडकर,नारायण झेंडेकर,
रुक्मिणी अंबादास झेंडेकर, पूजा देविदास झेंडेकर, राजाभाऊ लाड, सरस्वती लाड, श्रीपाद,लाड सदाशिव लाड तलवाडा येथील आज्जी आजोबा शंकर लाड, शशिकला लाड, नारायण, औंकार, रुक्मिणी, रेणुका गौरी लाड,शारदा विद्या मंदिर परिवार व सर्व वर्ग मित्र यांनी अभिनंदन केले. यावेळी त्यांच्या आज्जी शिलाबाई यलिगार यांच्या डोळ्यातून आनंदाश्रु वाहत होते,मोठे चुलते,चुलती,मोठा भाऊ ऊमेश,योगेश यांच्या सह नातेवाईकांनी हार तुरे पुष्पगुच्छ देऊन पेढे भरून त्याचा सत्कार केला व अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. समर्थ च्या या यशाबद्दल साप्ताहिक साप्ताहिक गेवराई संघर्ष योद्धा च्या वतीने त्याचे खूप खूप अभिनंदन व पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 3 1 1 9 9

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे