ब्रेकिंग
सैन्य दलातील अधिकारी पदासाठी पुर्व प्रशिक्षण
0
3
1
1
7
4
जालना/प्रतिनिधी,दि.20
भारतीय सैन्यदल, नौदल व वायुदलामध्ये अधिकारी पदावर भरती होण्यासाठी पात्र उमेदवारांना सर्विस सिलेक्शन बोर्ड या परीक्षेची मोफत पुर्व तयारी करुन घेण्यासाठी छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक येथे महाराष्ट्र शासनाकडून एसएसबी कोर्स क्र. 58 आयोजित करण्यात येणार आहे. तरी जालना जिल्ह्यातील इच्छूक युवक-युवतींनी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, जालना येथे दि. 3 ऑक्टोबर 2024 रोजी सकाळी 11 वाजेपर्यंत मुलाखतीस हजर रहावे. अधिक माहितीसाठी दुरध्वनी क्र. 0253-2451032 किंवा व्हॉट्सअप क्र. ९१५६०७३३०६ वर संपर्क करावा, असे जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, जालना यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.
0
3
1
1
7
4