जिल्हा परिषदेत मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत 15 प्रशिक्षणार्थ्यांना आदेशाचे वाटप

जालना/प्रतिनिधी,दि. 9
मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत जालना जिल्हा परिषदेत 15 प्रशिक्षणार्थींची निवड करण्यात आली. तरी जालना जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा मीना यांच्या हस्ते निवड केलेल्या प्रशिक्षणार्थ्यांना आदेशाचे वाटप करण्यात आले.
यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. जयश्री भूसारे, माता बाल संगोपन अधिकारी डॉ. जी.डी.मस्के, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. एन.जी. पवार यांची उपस्थिती होती. उमेदवारांची शैक्षणिक अर्हता, आधार नोंदणी, कौशल्य रोजगार व उद्योजकता आयुक्तालयाच्या संकेतस्थळावर नोंदणीकृत उमेदवार, वयोगट आदि कागदपत्रांची तपासणी करुन शासनाच्या नियमानूसार निवड करण्यात आली. निवड करण्यात आलेल्या प्रशिक्षणार्थ्यांना शैक्षणिक अर्हतेनूसार कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागामार्फत डिबीटी प्रणालीद्वारे विद्यावेतन अदा करण्यात येणार आहे. असे प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविण्यात आले आहे.