डॉ.बाबासाहेब यांना जासई हायस्कूल तर्फे अभिवादन

उरण/विठ्ठल ममताबादे,दि.14
रयत शिक्षण संस्थेच्या श्री छत्रपती शिवाजी हायस्कूल व लोकनेते दि.बा. पाटील ज्युनिअर कॉलेज,दहागाव विभाग जासई, ता.उरण जि. रायगड या विद्यालयामार्फत भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार, महामानव ,विश्वरत्न,डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३३ व्या जयंतीदिनी अभिवादन करण्यात आले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष भारतीय मजदूर महासंघाचे राष्ट्रीय महामंत्री, कामगार नेते, शाळा व्यवस्थापन व विकास समितीचे अध्यक्ष सुरेश पाटील यांनी विद्यालयाच्या प्रांगणातील डॉक्टर बाबासाहेबांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून पूजन केले. विद्यालयाचे प्राचार्य रयत शिक्षण संस्थेचे लाईफ वर्कर अरुण घाग यांनी इतर महापुरुषांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. या कार्यक्रमासाठी विद्यालयाच्या उपमुख्याध्यापिका पाटील एस. एस,रयत सेवक संघाचे महाराष्ट्र समन्वयक, दि.रयत सेवक को-ऑप.बँक सातारा चे मा.व्हाईस चेअरमन नुरा शेख आणि विद्यालयातील सर्व सेवक वर्ग अभिवादन करण्यासाठी उपस्थित होते.